Leopard Attack On Moving Bike Viral Video : जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरून कधी, कुठे, कोणावर हल्ला करून जातील याचा काहीच नेम नाही. ज्या ठिकाणी घनदाट जंगल, नॅशनल पार्क, तर काही डोंगराळ राज्यांमध्ये हत्ती, वाघ आणि बिबट्या माणसांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्या राज्यातली अनेक ठिकाणी बिबट्या किंवा वाघ माणसांवर हल्ला करतात आणि त्यांचा जीव घेतात. सध्या असाच काहीसा प्रसंग घडला असता. पण, बिबट्याचा निशाणा चुकला आणि नशिबाने दुचाकीवर बसलेल्या काही माणसांचा जीव वाचला.

व्हायरल व्हिडीओ बीडच्या तिरुमलाजवळचा आहे. प्रचंड काळोखात एका कारच्या डॅशकॅममध्ये एक धक्कादायक घटना रेकॉर्ड झाली आहे. दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेले दोघे जण थोडक्यात वाचले आहेत. एसव्ही झू पार्क रस्त्यावरून दुचाकीस्वार जात असताना बिबट्याने चालत्या दुचाकीवर थेट झडप घालण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि तिघांचा जीव थोडक्यात वाचला आहे.

बाईकस्वारांनी न थांबता, वेगाने पळ काढला (Viral Video)

व्हिडीओत कारच्या डॅशकॅममधून दिसणाऱ्या दृश्यानुसार बिबट्या अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमधून बाहेर पडतो आणि थेट दुचाकीवर उडी मारण्याचा प्रयत्न करतो. पण, अंदाज चुकला आणि बिबट्या पुन्हा जंगलात झाडांमध्ये पळून गेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जंगलात लपून बसलेल्या या धक्कादायक धोक्याची जाणीव नसलेल्या बाईकस्वारांनी न थांबता, वेगाने पळ काढला आणि त्यामुळेच त्यांना जीवदान मिळाले आहे. अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ एकदा बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा तिरुमलाकडे जाणाऱ्या आणि अलिपिरी वॉकवेजवळ बिबट्याच्या उपस्थितीची पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. कारण- अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @jsuryareddy या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये संपूर्ण घटना सविस्तर लिहिण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून मानवी वस्तीबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहेत आणि या व्हिडीओने सगळ्यांनाचा थक्क करून सोडले आहे.