viral Video: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येतात. त्यात जंगलातीलही अनेक व्हिडीओ असतात; जे अनेकांना चकित करून सोडतात. पर्यटकांचा जंगलातील प्राण्यांसोबत कशा प्रकारे सामना होतो, एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार कशी करतो हेसुद्धा अनेक व्हिडीओंतून आपल्याला पाहायला मिळतं. पण, आज व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक सिहींण तिच्या पिल्लांना झाडावर चढण्याचे प्रशिक्षण देताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातील आहे. सिहींण झाडावर उभी आहे आणि व तिची चार पिल्ले झाडाखाली खेळताना दिसत आहेत. ज्याच्या सिहींण तिच्या पिल्लांना इशारा देते आणि त्यांना झाडावर चढण्यासाठी प्रोत्साहित करते. त्यानंतर सिंहीणीचे एक पिल्लू हळूहळू झाडाची साल लहान पंजांनी पकडून झाडावर चढताना दिसते. काही वेळाने सिहींणीचे पिल्लू यशस्वीरीत्या आईजवळ पोहचते. एकदा बघाच हा व्हिडीओ.

हेही वाचा…ग्राहक बनून दुकानात शिरल्या अन्… महिलांची चोरी CCTV मध्ये कैद, पाहा व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, सिहींणीचे एक पिल्लू यशस्वीरीत्या झाडावर पोहचते व सिहींण त्याला मायेनं कुरवाळताना दिसत आहे. तर उर्वरित तीन पिल्ले झाडावर पोहचलेल्या पिल्लाचे अनुसरण करताना दिसून आले आहेत. एकूणच या हृदयस्पर्शी व्हिडीओने अनेक वन्यजीवप्रेमींना थक्क करून सोडलं आहे. जंगलात अनेक प्राणी असतात जे पिल्लांवर हल्ला करतात. तर अशा प्रसंगी स्वतःचा जीव कसा वाचवायचा याचं बहुदा प्रशिक्षण सिहींण पिल्लांना देत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या मायकेल मॉथ या व्यक्तीने हा सुंदर व्हिडीओ शूट केला आहे व त्याच्या @Letestsightings या युट्युब अकाउंटवरून १९ एप्रिल रोजी शेअर केला आहे. हा व्हिडीओ आई आणि लेकरं यांच्या विलक्षण बंधनाचे एक उत्तम उदाहरण व जंगलात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकण्याचे महत्त्व अधोरेखित करतो आहे.