Viral Video: अनेकदा सार्वजनिक ठिकाणी किंवा दुकानात मौल्यवान सामान, वस्तू चोरल्या जातील अशी भीती प्रत्येकाच्या मनात असते. कारण – अनेकदा चोरटे गर्दीचा फायदा घेत, चोरी करून पळ काढतात आणि मग मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मेडिकल असो किंवा एखादे किराणामालाचे दुकान प्रत्येक दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा हा लावलेलाच असतो ; जो अशा चोरांवर लक्ष ठेवण्यास मदत करतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात चक्क दोन महिला दुकानात जाऊन अंडी चोरताना दिसून आल्या आहेत.

व्हायरल व्हिडीओ चिकनच्या दुकानाचा आहे. दोन महिला दुकानात चिकनची खरेदी करण्यासाठी गेलेल्या दिसत आहेत. दुकानदार चिकन कापत असतो. पण, या दरम्यान महिला दुकानात ट्रे मध्ये ठेवलेलं एक अंड उचलते. दुकानदार चिकन कापण्यात मग्न असतो. तर याचा फायदा घेऊन महिला आणखीन एक अंड उचलते आणि तिच्या पिशवीत ठेवायला जात असते तितक्यात दुकानदाराला संशय येतो आणि तो मागे वळून बघतो. पुढे नक्की काय घडलं एकदा व्हायरल व्हिडीओतून बघा.

Meerut jcb accident couple bike hit by jcb machine women save by narrow escape video
मृत्यू जवळ आला पण चमत्कार झाला; दैव बलवत्तर म्हणून ‘ती’ अशी बचावली, पाहा थरारक VIDEO
two young girls fighting
तुफान राडा! दोन तरुणींची दे दणादण हाणामारी पाहून WWE विसरुन जाल, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, अन्… Video व्हायरल
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
desi jugaad boy started crying when traffic police caught his scooty funny video goes viral on social media
“काकी प्लीज मला सोडा, पप्पा…” ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलाचा अनोखा जुगाड; मजेशीर VIDEO व्हायरल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Viral video: Man assaults wife on Chennai flyover
VIDEO: बायकोला पुलावरुन खाली फेकत होता तेवढ्यात पोलीस…महिलेचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा…“मी मेंटेनन्स भरतो!” खिडकीबाहेर कचरा फेकणाऱ्याची अजब दादागिरी; मुंबई लोकलचा ‘हा’ VIDEO बघाच

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, महिला दुसरं अंड पिशवीत ठेवायला जाते तेव्हा दुकानदार पटकन मागे बघतो आणि पिशवीत काय ठेवलं असे विचारतो आणि पिशवीत डोकावून पाहतो. दुकानदाराला संशय आला हे कळताच महिला “मी दुसऱ्या दुकानातून अंडी खरेदी केली” असे सांगताना दिसते. महिलेनं नकार दिल्यानंतर दुकानदार सीसीटीव्हीकडे बोट दाखवतो आणि दोन महिला आणि दुकानदारांमध्ये प्रचंड वाद होतो आणि व्हिडीओचा शेवट होतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे घडलेला सर्व प्रकार रेकॉर्ड झाला आहे आणि दुकानदाराच्या हुशारीने दोन्ही महिलांची चोरी पकडली गेली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करताना दिसत आहेत आणि ‘सीसीटीव्ही नसता तर या महिलेची चोरी पकडली गेली नसती’ ; असे म्हणताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.