Viral Video: सोशल मीडियावर आपण दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ पाहतो. यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते, काही व्हिडीओंमुळे थरकाप उडतो, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला नवल वाटते. सध्या असाच एक अनेकांना आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्याची कधी कोणी कल्पनाही केली नसेल. शिवाय या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.

भारतात मद्यपान करणाऱ्यांची कमी नाही. अगदी खेड्यापासून ते मोठमोठ्या शहरांपर्यंत लाखो लोक मद्यपान करतात. भारतातील काही राज्यांमध्ये मद्यपानावर बंदी घालण्यात आलेली आहे, त्यामुळे काही मद्यप्रेमी दुसऱ्या राज्यांमधून स्टॉक मागवतात. मद्याची अशी तस्करी करणंदेखील खूप मोठा गुन्हा आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळतंय, जे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बिहारमधील व्यक्ती मद्याचा स्टॉक विकत घेण्यासाठी उत्तर प्रदेशात गेला असून, तिथून निघताना काही पोलिस संशय आल्याने त्याला पकडतात आणि त्याच्या हातात असलेला पुस्तकांचा संच उघडायला लावतात. यावेळी या पठ्ठ्याने चक्क पुस्तकांमध्ये मद्याच्या बाटल्या लपवल्या होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jitu_kumar_sahani__या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत १६ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘आप्पाचा विषय हार्ड…’ श्वानाला डबल सीट घेऊन वृद्ध व्यक्तीचा स्वॅग; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आप्पा सापडले…”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “बिहारमध्ये काहीही होऊ शकतं”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “डोळ्यांसमोर धोका”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “काकांसोबत त्यांच्याच माणसांनी दगा दिला आहे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “काका कसे सापडले”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “पुस्तकातून मद्याची तस्करी, बापरे.”