Son Places First Pay in Parents Hands : फर्स्ट आर ऑल्वेज स्पेशल असे आपण अनेकदा ऐकले असेल. आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट खूप जास्त खास असते. पहिले प्रेम, पहिला सायकल, शाळा कॉलेजचा पहिला दिवस, पहिली गाडी, पहिले घर आणि कधीच न विसरणारी गोष्ट म्हणजे तुमची पहिली नोकरी आणि पहिला पगार. आपण स्वतः काम करून मिळवलेला पहिला पगार खूप खास आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; त्यामध्ये पहिला पगार लेकाने खास पद्धतीत कुटुंबातील सदस्यांना दिला आहे.
पहिला पगार हातात आल्यानंतर कधी आपण घरातील मंडळींना सांगतोय असं आपल्याला होऊन जाते. तर असाच काहीसा क्षण गाझियाबादमधील आयुषमान सिंग नावाच्या रहिवाशाने त्याच्या पालकांना पहिला पगार देतानाचा भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. आई-बाबांना डोळे बंद करायला सांगून हात पुढे करून बसायला सांगतात. त्यानंतर लेक येतो आणि मग आई-बाबांच्या हातात पैसे ठेवतो. हातात पैसे ठेवल्यावर दोघेही भरपूर खुश होतात आणि आई तर चक्क टाळ्या वाजवायला सुरुवात करते.
त्यांच्या डोळ्यांतील अभिमान बघा (Viral Video)
मुलांचे शिक्षण पूर्ण झाले की, त्याला आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळावी असे स्वप्न असते आई-वडिलांचे असते. पण, मुलांचे स्वप्न त्या नोकरीचा पहिला पगार आई-वडिलांच्या हातात देणे असते. आज हेच स्वप्न एका लेकराचे पूर्ण झाले आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पगारातील थोडीशी रक्कम हातात टेकवल्यावर त्यांच्या डोळ्यातील आनंद आणि अभिमान अगदी बघण्याजोगा आहे. आई-बाबा आणि लेकरामधील हा खास क्षण एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aayushman2703 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “पहिला पगार, थेट पालकांना. परिपूर्ण नाही पण मला एवढेच मिळाले,हिला पगार आई-वडिलांना दिला;परफेक्ट नाही पण जेवढं शक्य आहे तेवढं प्रेमाने केलं” ; अशी कॅप्शन पोस्टला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “खूप हृदयस्पर्शी, प्रेमळ आणि प्रेरणादायी”, “त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा”, “दादा, तू काय वस्तू घेतोस किंवा किती पैसे देतोस, याला काही अर्थ नाही.खरं मूल्य असतं त्यांच्या डोळ्यांतील अभिमानाचं, जेव्हा तू तुझ्या पगारातील एक छोटासा भागही त्यांना देतोस. तेव्हाच त्या क्षणाला खरं महत्त्व मिळतं”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.
