Man Sketches Chhatrapati Shivaji Maharaj’s Portrait : जिथे शब्द कमी पडतात तिथे चित्र बोलतात. शब्दांच्या पलीकडे जाऊन एखादा विषय समजवण्याचं, एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल आदर दाखवण्याचं काम चित्र करतात. त्यामुळे कलाकार यासाठी आपले सर्वस्व अशा कलाकृतीमध्ये ओतत असतो. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. कारण आज एका प्रवाशाने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र नखांनी काढण्याचा प्रयत्न करत होता.

महाराष्ट्रातील अनेक मराठी माणसांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खूप अभिमान आहे. कोणी गाडीवर, कोणी बाईकव छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्टिकर्स लावतात, कोणी त्यांचे चित्र असणारे किचेन तर कोणी आवडीने त्यांची पुस्तके वाचताना दिसतात. पण, आज एका रिक्षात बसलेल्या प्रवाशाला एक अनोखी गोष्ट दिसली. रिक्षातून प्रवास करणारा एका प्रवाशाने रिक्षा चालकाच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाचे अनोखे टॅलेंट पहिले.

नखाने काढलं छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र (Viral Video)

रिक्षातून प्रवास करणारा हा प्रवासी एका कागदावर त्याच्या नखांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे चित्र काढण्याचा प्रयत्न करत होता. नखांद्वारे चित्र काढण्याचा हा प्रयन्त इतका सुंदर होता की, मागे बसलेला दुसरा प्रवासीही हे दृश्य कॅमेरामध्ये रेकॉर्ड करण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्याच्या प्रत्येक खुणा त्यांनी अगदी हुबेहूब नखांच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी सुद्धा झाला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vlog_sarkhyalavarkhe_s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “रिक्षातून प्रवास करणारा एक माणूस आपल्या नखाने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढण्याचा प्रयत्न करत होता, हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण होता. महाराष्ट्रीय माणसे प्रतिभावान आहेत” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून त्या माणसाचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.