Viral Video Women Went To KFC After Pregnancy: आई झाल्यावर स्त्रियांचा दुसरा जन्म होतो असे म्हणतात. आपल्या पोटात एका बाळाला वाढवणे, त्याचा सांभाळ करणे वाटते तितके सोपे नसते. मातृत्वाच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येक स्त्रीच्या शरीरात फार मोठे बदल होत असतात. त्याचबरोबर हे बदल होताना उलटी होणे, झोपण्यास त्रास होणे, चालण्यात अडचण येते आणि दररोज काही तरी वेगळं खाण्याची इच्छा होते. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल.
गरोदरपणात अनेकदा काही ना काही खाण्याची इच्छा निर्माण होते. त्याला डोहाळे लागणे असे म्हणतात. अनेकदा मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य त्या महिलेलाकाय हवं नको ते खायला आणून देतात. पण, तर व्हायरल व्हिडीओत घरच्यांनी नाही तर चक्क केएफसी कर्मचाऱ्यांनी एका महिलेचे डोहाळे पुरवले आहेत. तर डोहाळे पुरवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी @durbankingcaleb इन्स्टाग्राम युजरने खूप सुंदर गोष्ट केली आहे; जी कदाचित तुमच्याही डोळ्यांत पाणी आणेल.
गरोदरपणात महिला केएफसीमध्ये जायची. यादरम्यान तेथील कर्मचाऱ्यांनी तिला नेहमीच डोहाळे पुरवण्यासाठी मदत केली, तिला जे हवं ते खायला दिले. तर हीच गोष्ट लक्षात ठेवून बाळ झाल्यानंतर ती महिला खास आपल्याला लेकराला घेऊन केएफसीमध्ये गेली. फक्त केएफसीमध्ये गेली नाही; तर तेथील कर्मचाऱ्यांच्या हातात बाळ देऊन सगळ्यांशी नकळत त्यांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे ओळख करून दिली. केएफसीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिला कर्मचारीने बाळाला हातात घेऊन त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @majicallynews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आल्या आहेत. तसेच “ते फक्त कर्मचारी नाही; तर कुटुंब आहेत” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून अगदी केएफसी अधिकृत अकाउंटवरून सुद्धा कमेंट आली आहे “आम्हाला असाच कन्टेन्ट हवा असतो”, इतर युजर्स देखील “महिलांना पाठिंबा देणाऱ्या महिला”, “बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्या मावश्यांनी बाळाला वाढवलं” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.