Cute video: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ प्रचंड गाजत आहे. रोज नवनवीन गमतीशीर व्हिडीओ पाहायला मिळतात; पण या व्हिडीओनं लोकांच्या चेहऱ्यावर खरंच हसू फुलवलं आहे. एका लहान मुलीचा हा व्हिडीओ तिच्या निरागस बोलण्यामुळे आणि गोड भावनांमुळे क्षणात व्हायरल झाला. आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जगात, या लहान मुलीच्या शब्दांनी लोकांच्या हृदयात एक अनोखी सांत्वनाची भावना निर्माण केली आहे.
हा व्हिडीओ एका गोड मुलीचा आहे, जी आपल्या आईकडे प्रेमाने आणि हट्टाने बिर्याणी बनवण्याची मागणी करते. आईने जेवणात ढेमशाची भाजी बनवल्याचं सांगितल्यावर मुलीची गोड प्रतिक्रिया पाहून सगळेच हसले. हा व्हिडीओ ‘क्यूट गर्ल व्हायरल व्हिडीओ’ नावाने अनेक सोशल मीडिया पेजेसवर शेअर करण्यात आला असून, काही तासांत त्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत.
व्हिडीओच्या सुरुवातीलाच आई मुलीला विचारते की, जेवणात काय बनवू? त्यावर ती निरागसपणे विचारते, “आज काय बनवलं आहे मम्मा?” आई म्हणते, “ढेमसे.” एवढं ऐकताच मुलगी चेहरा वाकडा करते आणि म्हणते, “ढेमसे कोण खातं मम्मा! मला बिर्याणी पाहिजे.” तिच्या आवाजातील गोड चिडचिड, निरागस चेहरा व खोडकर हावभाव सर्वांचे लक्ष वेधून घेतात. ती पुढे म्हणते, “ढेमसे काही खाण्याची गोष्ट नाहीये, तू बिर्याणी बनव!” या एका वाक्यानं इंटरनेटवर कहर केला. तिच्या बोलण्यातली नैसर्गिकता आणि निर्दोष भाव बघून लोक तिच्यावर फिदा झाले आहेत.
पाहा व्हिडिओ
या व्हिडीओवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया केल्या आहेत. एका युजरने लिहिले – “ढेमसे खायला कोणाला आवडतंय रे खरंच! पण या मुलीनं आमचं मन जिंकलं.” दुसऱ्या युजरने मजेत लिहिले – “बिलकूल बरोबर बोललीस बाळा, ढेमसे कोण खातं!” आणखी एका युजरने हसत लिहिले – “त्यासाठी लगेच बिर्याणी बनवा, किती गोड बोलते ही!” एका व्यक्तीने विनोदी अंदाजात लिहिले – “माझी मुलगीही अशीच बोलेल. कारण- तिच्या आईने गर्भावस्थेत खूप बिर्याणी आणि चायनीज खाल्लं होतं!”
या व्हिडीओने हे सिद्ध करून दाखवले आहे की, सोशल मीडियावर सर्वाधिक हृदय जिंकणारी गोष्ट म्हणजे लहान मुलांची निरागसता आणि खरी भावना. या मुलीच्या गोड बोलण्यातून पुन्हा एकदा जाणवले की, जगातली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे मुलांचे हसणे आणि त्यांची निरागस दुनिया.
