Viral Video: मुलगी म्हणजे मायेचा कळस, मुलगी म्हणजे करुणेचा सागर असं अनेकदा म्हटलं जातं. मुलगी खूप भावनिक असते तितकीच खंबीरही असते. आनंदापेक्षा दु:खात सहभागी होणारी ही मुलगीच असते. न सांगता दु:ख समजणारीही तीच असते.
मुलींना काही गोष्टी आपोआपच कळतात असं म्हणतात. म्हणून लाडा गोडात वाढवलेली लेक सासरी जाऊन तितकाच भार सांभाळते. इतकंच नाही तर मुलगी जन्माला आली की लक्ष्मीच सोनपावलांनी आली असं म्हणतात. पण एवढं सगळं असूनही आजच्या काळातही अनेकांना मुलगा म्हणजेच वंशाचा दिवा हवा असतो.
सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एका अशा व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय जो पाहून तुम्हीही भारावून जाल.
व्हायरल व्हिडीओ (Girl Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, रस्त्यावर काही गोष्टी विकणाऱ्या एका वयोवृद्ध माणसाला एक चिमुकली स्वत:च्या हाताने पाणी पाजतेय. आपल्या वडिलांबरोबर आलेली ही मुलगी वयोवृद्ध माणसाला बघताच त्याची सेवा करू लागते. पाण्याची बाटली घेऊन त्या वयोवृद्ध माणसाला पाणी देते. हे पुण्याचं काम ती अगदी स्वेच्छेने पुढाकार घेऊन करते. तिच्या वडिलांचा यात तिला संपूर्ण पांठिबा असल्याचं दिसून येतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @writer_altaf__001 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “वंशाचा दिवा पाहिजे म्हणून रडतात काही लोक, त्या लोकांनाही हा व्हिडीओ बघितल्यावर समजेल की, मुलीही मुलांपेक्षा कमी नाहीत.”. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
युजर्सनी शिक्षिकेच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “खूप छान व्हिडीओ” तर दुसऱ्याने कमेंट करीत लिहिलं, “सगळी मुलं सारखीच नसतात आणि सगळ्या मुली पण सारख्या नसतात. त्या मुलीला हे संस्कार लावणारा आणि सपोर्ट करणारा पण एक मुलगाच आहे.हे पण खरं आहे काही मुलांना दुसऱ्यांच्या आई-वडीलांची दया येते पण स्वतःचे आई-वडील नको असतात.” तर एकाने असं नसतं ”मुलगा पण खूप काही करतो” अशी कमेंट केली.