Viral Video of Girl Climbed on Wall:  सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ इतक मजेशीर असतात की जे पाहून आपल्याला हसू आवरणे कठीण होते. असाच प्रकारचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान मुलगी झपाझप भिंतीवर चढते आणि तशीच खाली उतरते. हा व्हिडीओ पाहून अनेकांना स्पायडर मॅनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. यामुळे ही तर स्पायडर मॅनची बहिण अशी प्रतिक्रिया आता युजर्स देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भिंतीवर झपाझप चढण्याची पावर फक्त सुपर मॅन किंवा सुपर वुमनकडेच असते पण आता माणसातही असे खतरनाक टॅलेंट दिसत आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल, अनेक लहा मुलं स्पायडरमॅनचे चाहते असतात म्हणून ते त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे, ज्यात एक छोटी मुलगी स्पायडर मॅनची नक्कल करताना दिसत नाही तर, ती खरोखरचं स्पायडरमॅनसारखी झपाझप भिंतीवर चढत आहे.

अरे ही तर स्पायडरमॅनची बहिण!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी लहान दिसत आहे जी दोन अरुंद भिंतींच्या मध्ये उभी आहे. इथे उभी राहून ती एका झटक्यात भिंतींना दोन पाय लावून चढते आणि पटकन घराच्या छतापर्यंत पोहोचते. यानंतर ती सहज खाली येते. तिची ही स्टंटबाजी पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल. या स्टंट गर्लचा व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ pandiyarajan1219 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत १ लाख ४९ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर अनेकांनी कमेंट केली आहे. शेकडो लोकांनी मुलीच्या कौशल्याचे आणि सामर्थ्याचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of girl quickly climbed on wall like spider man sjr