School girls video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून वयोवृद्धापर्यंत सगळेच ठेका धरताना दिसतात. काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणीदेखील डान्स करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्येचं मंदिर मानलं जाणाऱ्या शाळा-कॉलेजमध्येदेखील आता अशाप्रकारचा प्रकार सुरू झाला आहे. शालेय विद्यार्थी युनिफॉर्म घालून अश्लील डान्स करू लागले आहेत. अभ्यास सोडून फक्त प्रसिद्धीसाठी थिल्लरपणा करू लागले आहेत. सध्या अशाचप्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा… “शेवटी विषय संस्कारांचा होता”, दोन मुलींनी केलेल्या कृतीने वेधलं सगळ्यांचं लक्ष, VIDEO पाहून कराल कौतुक

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दोन मुली शाळेच्या युनिफॉर्ममध्ये डान्स करताना दिसतायत. हिरव्या रंगाचा स्कूल युनिफॉर्म घालून दोघी हरियाणी गाण्यावर थिरकताना दिसतायत. विद्यार्थिनींचा डान्स सुरू असताना एक लहान मुलगा त्यांना पाहून अडवतो आणि त्यांच्या आईला बोलावून आणतो. आई बाहेर येताच दोघांचा असा डान्स पाहून दोघींना मारायलाच लागते.

हा व्हिडीओ @veer_edits79 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “अरे ऐसे कौन मारता है यार, इनको तो बेल्ट से मारो” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल २२.७ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… ‘दिलबर दिलबर…’, स्टेजवर शाळेतील विद्यार्थ्याचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “मागे बसलेल्या मॅडम…”

युजर्सच्या प्रतिक्रिया

विद्यार्थिनींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या विद्यार्थिनींनी शाळेचा गणवेश घालून व्हिडीओ बनवल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हा काय थिल्लरपणा आहे.” दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “असंच केलं पाहिजे.” तर एकाने कमेंट करत लिहिलं, “बरोबरच केलं, गणवेशात डान्स करतायत तर या दोघींना असं पट्ट्यानेच मारायला पाहिजे.”

हेही वाचा… भांडी घासण्याची ही कोणती पद्धत? महिलेचा जुगाडू VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “या काकींना…”

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आजकाल व्हायरल होत असतात. याआधी कॉलेजमध्ये, क्लासमध्ये, शाळेतही अशाप्रकारच्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of school girls dancing in uniform mother beats them dvr