Viral Video Daughter first flight With Pilot Father : मुलगी आणि वडिलांचा नातं म्हणजे प्रेमाची, विश्वासाची एक अविश्वसनीय जोडी असते .वडिलांच्या प्रेमळ नजरेतून मुलीला आत्मविश्वास मिळतो, आणि तिज्या हसण्याने वडिलांच जग बनत .अशातच सोशल मीडियावर सध्या एक व्हायरल व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे, जो लोकांची मने जिंकत आहे. हा व्हिडीओ एका पायलट वडिलांचा आहे, ज्यांनी त्यांच्या लहान मुलीचा पहिला विमान प्रवास अविस्मरणीय बनवली आहे. या क्षणाने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत आणि सोशल मीडियावर हजारों लाइक्स, कमेंट्स आणि शेअर मिळाले आहेत.

व्हिडीओमध्ये दिसते की, पायलट वडील लेकीला विमानात घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी विमानात लेकीबरोबर प्रवेश केल्यानंतर मायक्रोफोन हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजात गर्व, प्रेम स्पष्टपणे जाणवत होते. लेकीच्या पहिल्या विमान प्रवासाबद्दल सांगत पायलट वडील म्हणाले “आजचा विमान प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे, कारण माझी लहान मुलगी तिच्या पहिल्या विमान प्रवासासाठी तयार आहे. ती फक्त अठरा महिन्यांची असून माझी पत्नीही माझ्याबरोबर आहे”.

तुम्ही पाहिले असेल की, पायलटने आपल्या मुलीचे स्वागत किती प्रेमाने केले. तसेच याचदरम्यान लेक सुद्धा बाबांकडे आनंदाने पाहत होती. त्यानंतर पायलटने मायक्रोफोनवरून सांगितले की, हा त्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहे. हे ऐकून प्रवाशांनी टाळ्या वाजवत या क्षणाचा आनंद व्यक्त केला. हा क्षण फक्त त्या कुटुंबासाठी नाही, तर विमानातील प्रत्येक प्रवाशासाठीही आनंददायक ठरला.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @captainwalker__ आणि @rupalsinghchauhan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये “सगळ्यात गोड प्रवाशासोबत प्रवास केला” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

अनेकांनी कमेंट करून आपले प्रेम आणि भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी म्हटले की हा फक्त व्हिडीओ नाही, तर वडील आणि मुलीच्या नात्याचा सर्वात सुंदर क्षण आहे. इतरांनी व्हिडीओ शूट केलेल्या पत्नीचे कौतुक केले आणि या प्रेमळ क्षणाचे स्मरण ठेवण्यासाठी तिला धन्यवाद दिले.तर एकाने म्हणटले “अद्भुत! आपण आपल्या संपूर्ण आयुष्याचा अनुभव अशा खास क्षणांसाठी जगतो!” हा व्हिडीओ फक्त एका पायलट आणि त्याच्या मुलीच्या प्रेमाचा क्षण दाखवत नाही, तर आपल्या आयुष्यातील लहान आनंदाच्या क्षणांची महत्त्वता लक्षात आणून देतो”; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.