Viral Video Kids Reaction to Meeting a Foreigner Woman First Time : जेव्हा जेव्हा परदेशातील मंडळी एखाद्या अनोळखी शहरात पहिल्यांदा जातात. त्यांचे राहणीमान, त्यांची बोलण्याची स्टाईल, त्यांचा रंग, त्यांची त्वचा पाहून सगळेच त्यांच्याकडे एकटक बघत राहतात. काही जण उत्साहाने त्यांच्याबरोबर फोटो काढतात, तर काही जण अगदी त्यांचा गैरफायदासुद्धा घेतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून कदाचित तुम्ही थक्क होऊन जाल.
लाव म्हणजेच लाओस हा आग्नेय आशियातील थायलंड, व्हिएतनाम, कंबोडियासारखाच एक देश. या देशातील एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. परदेशातील पर्यटकांना कमी परिचित देशांमध्ये पाहिल्यावर त्यांच्याकडे कौतुकाने बघितले जाते. पण, लाओसमधील अलीकडच्या अनुभवाने हे मत आता कदाचित बदलणार आहे. एक परदेशी महिला एका गावातील शाळेत गेली. पण, तिला पाहून सगळेच वर्गातून पळून गेले, काही जोरजोरात रडू लागले, तर काही अगदी फळ्याच्या मागे जाऊन लपू लागले. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
परदेशी महिलेला पाहून घाबरली गावाकडची मुलं (Viral Video)
पण, पर्यटकांना मात्र हसू आवरले नाही. त्यांनी हा सर्व प्रकार त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला आहे. फक्त रेकॉर्डच केला नाही, तर सोशल मीडियावरही पोस्ट केला. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे स्थानिकांनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्ट केले की, गावात फारसे पर्यटक येत नाहीत. त्यामुळे परदेशी लोकांबद्दल, विशेषतः गोऱ्या लोकांबद्दल शाळेतील मुलांना काही कल्पना नव्हती. त्यामुळे परदेशी पर्यटक महिलेला पाहून, अनेक जणांना ती भूत किंवा आत्मा आहे, असे वाटले आणि सगळी मुले घाबरून रडायला लागली.
व्हिडीओ नक्की बघा…
भूत, आत्मा अशा अनेक भ्रामक कल्पना लहान मुलांच्या डोक्यात ठाण मांडून राहिल्या की, त्यांच्या डोक्यात त्याच त्या गोष्टी फिरत राहतात. गावाकडच्या चिमुकल्यांबरोबरचसुद्धा असेच काहीसे घडले. परदेशातील दुधासारखी गोरी दिसणारी महिला पाहून चिमुकल्यांना भूत, आत्मा गावात आल्यासारखे वाटले म्हणून त्यांनी परदेशी महिलेला पाहून रडत-रडत पळ काढला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aakibkhanofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. घडलेला सर्व मजेशीर प्रकार कॅप्शनमध्ये नमूद केला आहे.