Viral Video Stray Dog Drinking Water At Petrol Pump : लांबचा प्रवास असो किंवा आणखीन कुठला आपल्याबरोबर पाण्याने भरलेली एक बाटली बरोबर ठेव असे आई आपल्याला आवर्जून सांगत असते. पण, बॅगेत वजन घेऊन जाण्यापेक्षा आपण दुकानातील पाण्याची बाटली किंवा सार्वजनिक नळाचे पाणी पिण्यात सुख मानतो. बरोबर ना… पण, आज सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची भीती, भटक्या प्राण्याबद्दल दया आणि व्हिडीओ काढणाऱ्याचाही नक्कीच राग येईल.
व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पेट्रोल पंपावर एक अज्ञात व्यक्ती कॉलवर बोलत असते. त्या व्यक्तीच्या बरोबर मागे एक भटका श्वान फेरफटका मारत असतो. फक्त फेरफटकाच नाही पाण्याने भरलेले तिन्ही कॅनमधून त्याचा पाणी पिण्याचा प्रयत्न सुरु असतो. प्रत्येक पाण्याने भरलेल्या उघड्या कॅनच्या आतमध्ये जिभ घालून पाणी पिण्याचा प्रयत्न करत असतो;जे बघून तुम्हाला खूपच विचित्र वाटेल. एवढेच नाही तर हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघणारी एक अज्ञात व्यक्ती श्वानाला न थांबवता, त्याला एका भांड्यात पाणी काढून देण्याएवजी व्हिडीओ शूट करण्यात मग्न असते.
सर्वांनी पाणी पिण्याआधी काळजी घ्या (Viral Video)
ऑफिस, लग्न समारंभात पाणी पिण्यासाठी अनेकदा या प्लास्टिकच्या कॅनच्या माध्यमातून सगळ्यांना पाणी पुरवले जाते. पण, हे पाणी आपल्यापर्यंत कशाप्रकारे पोहचवले जाते याची झलक व्हिडीओत पाहायला मिळते आहे. भटक्या श्वानाने रस्त्यावर ठेवलेल्या प्रत्येक उघड्या कॅनच्या आतमध्ये जिभ घालून पाणी पिण्याचा प्रयत्न केला. भटका श्वान तर तिथून निघून जाणार. त्यानंतर ते कॅन तिथून इतरांपर्यंत पाणी पिण्यासाठी पोहचवले जाणार की नाही हे विचार करूनच तुमच्याही अंगावर काटा येईल.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vinan5295 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “पेट्रोल पंपावर श्वान कॅनमधलं पाणी पिताना दिसला; सर्वांनी पाणी पिण्याआधी काळजी घ्या” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही जण म्हणत आहेत “जर तुमच्यात माणुसकी असेल तर कृपया श्वानाला थोडे पाणी द्या” तर दुसरा म्हणतोय “तुझं रेकॉर्ड करून झालं असेल तर त्याला पाणी प्यायला दे” , तर तिसरा युजर म्हणतोय की, “प्रवास करताना घरून स्वच्छ पाणी बरोबर घेऊन जा. दुसऱ्याच्या पाण्यावर अवलंबून राहू नका” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.