Video Shows Watch How Cow Draw Water From A Tap : आपण सगळेच जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून असतोच. आता हेच बघा ना अगदी सकाळी उठण्यासाठी सुद्धा आपण अलार्मवर अवलंबून राहतो. प्रवास करण्यासाठी गाड्या तर अगदी जेवण गरम करण्यासाठी सुद्धा आपण मायक्रोवेव्ह ओव्हनवर अवलंबून राहतो. पण, जेव्हा आपण स्वतः एखादी गोष्ट कोणावर अवलंबून न राहता करतो तेव्हा मात्र त्याचे सुख वेगळेच असते. तर आज हेच दृश्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एका गायीने स्वतःची तहान अगदी अनोख्या पद्धतीने भागवली आहे.

व्हायरल व्हिडीओत रस्त्याकडेला एक कूपनलिका आहे. गायीला प्रचंड तहान लागलेली असते. कोणी आपल्याला पाणी द्यायला येईल याची वाट न बघता गायीने आत्मनिर्भर व्हायचे ठरवले. गाय शिंगाच्या मदतीने कूपनलीका सुरु करण्याचा प्रयत्न करता. पहिल्यांदा तिचे प्रयत्न अयशस्वी ठरतात. पण, अखेर कूपनलीका सुरु करून ती पाणी पिताना दिसते. कोणाचीही मदत न घेता, वाट न बघता गायीने ज्याप्रकारे स्वतःची तहान भागवली आहे; जे पाहून नेटकऱ्यांना सुद्धा कौतुक वाटते आहे.

माणसांप्रमाणे गाय कूपनलिकेतून पाणी पिताना दिसते (Viral Video)

जंगलात अन्न पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे प्राणी सहसा स्वतःच्या अन्न-पाण्याचा शोध स्वतःच घेत असतात. कधी कधी नागरी वस्तीकडे सुद्धा धाव घेण्यास सुरुवात करतात. पण, आज व्हायरल व्हिडीओत काहीतरी अनोखं पाहायला मिळालं आहे. माणसांप्रमाणे गाय कूपनलिकेतून पाणी पिताना दिसते आहे; जे पाहून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. माणसांच्या दैनंदिन हालचाली पाहून प्राणीही त्यांची नकल करतात आणि त्यांच्याप्रमाणे वागताना दिसतेय. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DJwBtIvJkjY/?igsh=MTlxZ3Rpb3Y3Nzd1aA%3D%3D

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @i.atharvvv__23 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘कोण कोण हा व्हिडीओ बघून खुश झालं’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण “व्हिडीओ काढण्यापेक्षा गायीला पाणी काढून दिलं असतंस तर बरं झालं असतं” तर अनेक जण ‘कॅमेरामनने त्याला मदत केली नाही हे चांगले झाले, नाहीतर त्याला नळातून पाणी कसे काढले जाते हे कळले नसते. आता स्वतःहुन कधीही आणि कुठेही पाणी पिऊ शकतो” ; आदी अनेक कमेंट्स केल्या आहेत.