Viral Video Shows office Team Transforms Train Cabin Into Projector Room : तुम्ही मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य अगदी भावंडांबरोबर सुद्धा रेल्वेने प्रवास केला असेल. पण, तुमच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांबरोबर (स्टाफ बरोबर)सुट्टीवर जाणे हा एक अनोखा अनुभव असतो. एक दिवस काम बाजूला ठेवून सर्व वयोगटातील सहकारी एकमेकांबरोबर अगदी आनंदात मजा-मस्ती करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये सुमारे ३० कर्मचाऱ्यांचा एक ग्रुप गोव्याला निघाला आहे. एवढेच नाही तर या सर्वानी मिळून ट्रेन प्रवास एका खाजगी थिएटरमध्ये बदलला आहे.

तर गोव्याला जाणारे एकूण ३० कर्मचारी असतात. सगळ्यांनी एकत्र बसण्यासाठी आजूबाजूच्या जागा बदलून घेतल्या होत्या. कारण – ट्रेन गोव्याला जाणारी होती. त्यामुळे बहुतेक जण ग्रुप-ग्रुपने प्रवास करत होते आणि बहुतेक लोक ट्रेनमध्ये जागे होते. त्यामुळे ऑफिस कर्मचाऱ्यांनपैकी काही लोकांनी मिळून अप्पर बर्थच्या साखळ्यांना पांढरी बेडशीट लटकवली आहे. त्यानंतर बेडशीट खाली सोडली जाते. त्यानंतर बेडशीट प्रोजेक्शन स्क्रीन सारखी दिसू लागते. त्यानंतर कर्मचारी प्रोजेक्टर चालू करतात आणि पॉपकॉर्नसह चित्रपट पाहण्यास सुरुवात केली.

पण, हा बेडशीटचा बनवलेला प्रोजेक्टर १५-२० मिनिटांपेक्षा जास्त वापरला नाही. कारण ट्रेनमध्ये वायफाय उपस्थित नव्हता. आवाजाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास फक्त जवळ बसलेल्यांनाच सिनेमाचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे ट्रेनमध्ये इतर प्रवाशांना कोणताही त्रास न देता गोष्टी नियंत्रित करण्यासाठी ऑफिसचे कर्मचारी काम करत होते. तसेच प्रोजेक्टर लावल्यामुळे कोणालाही त्रास झाला नाही किंवा कोणीही तक्रारही केली नाही. एकदा बघाच हा खास व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ds_family या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण प्रवाशांना त्रास होईल असे बोलताना दिसत आहेत तर अनेक जण “जे प्रवाशांना त्रास होईल असे बोलत आहेत तेच सार्वजनिक ठिकाणी पूर्ण आवाजात रील पाहतात”, “लोकं थुंकतात ते चालतं, स्पीकरवर गाणी वाजवली तर चालतं, पण, तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर तुम्ही पाप केले आहे भाऊ” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत…