Viral Video Students Celebrating Teachers Birthday : घरात एखादे लहान मुलं आले तर त्याला सांभाळणे कठीण होऊ जाते. पण, शिक्षिका दिवसभर शाळेत २० ते ३० मुलांना कोणतीही चिडचिड न करता सांभाळतात. याबदलत्यात शिक्षकांच्या विद्यार्थ्यांकडून फक्त मोजक्याच अपेक्षा असतात. पहिला म्हणजे विद्यार्थ्यांचा चांगला निकाल आणि दुसरा म्हणजे त्यांचा आदर करणे. तर आज काही मुलांनी शिक्षकेबद्दलचा त्यांचा आदर आणि आपुलकी एका अनोख्या पद्धतीने दाखवली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये काही विद्यार्थ्यांनी मिळून त्यांच्या वर्गशिक्षिकेचा वाढदिवस अनोख्या पद्धतीत साजरा केला आहे.
शिक्षिका वर्गात येण्याअगोदर विद्यार्थ्यांनी तयारी करून ठेवलेली असते. विद्यार्थ्यांकडे पैसे तर जास्त नव्हते म्हणून त्यांनी रिबीनच्या जागी दरवाजावर धागा बांधला, चायला रेड कार्पेट नव्हते म्हणून चटई घातली, फुलांच्या पाकळ्या आणि झाडांच्या फांद्याच्या मदतीने चटईवर लिहिले, निधी मॅम वाढदिवसाच्या शुभेच्छा असे लिहून त्यांचे छान चित्र सुद्धा काढले आणि सगळ्यात शेवटी कागदामध्ये गुंडाळून काही विद्यार्थ्यांनी गिफ्ट सुद्धा दिले; जे पाहून तुम्ही खरंच भारावून जाल एवढं तर नक्की…
शिक्षिकेची खरी कमाई (Viral Video)
वर्गात येण्यासाठी दरवाजावर लावलेला धागा शिक्षिकेला कैचीने कापण्यास सांगून काही विद्यार्थिनी त्याना वर्गात घेऊन आल्या. वर्गात येताच चटईच्या कार्पेटवर चालत येऊन त्या फळ्यापर्यंत पोहचला. विद्यार्थ्यांनी काढलेले सुंदर चित्र पाहून त्यांच्या चेहरा अगदी खुलून आला. एवढेच नाही तर सगळयात शेवटी सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून त्यांना काही भेटवस्तू असा अनोख्या पद्धतीत त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. एकदा बघाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @trend_spoter.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “शिक्षिकेची खरी कमाई” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत आणि “या शिक्षिका हे पाहून नक्कीच रडल्या असतील”, “तो धागा रिबनपेक्षा खूप मौल्यवान आहे. खूपच सुंदर.”, “जेव्हा विद्यार्थ्यांकडून अशा भेटवस्तू मिळतात तेव्हा आयुष्य जिंकल्यासारखे वाटते”, “माझ्याही आयुष्यात असा मौल्यवान क्षण आला होता” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…