Viral Video Teacher Birthday Celebration By Students : शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते अनोखे असते असे म्हणतात. युवापिढी देशाचे भवितव्य घडवते. त्यामुळे या पिढीला घडविण्यासाठी त्यांच्यावर शालेय वयातच चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षक दिवसरात्र मेहनत घेत असतात. पण, काही शिक्षक थोडे रागिष्ट, काही थोडे शिस्तबद्व तर अनेक जण हसत-खेळत विद्यार्थ्यांमध्ये रमून जातात; त्यामुळेच असे शिक्षक विद्यार्थ्यांचे फेव्हरेट म्हणजेच आवडते असतात. तर सोशल मीडियावरी व्हायरल व्हिडीओत अशाच एका आवडत्या शिक्षिकेचा विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा केला आहे.
शिक्षिकेचा वाढदिवस दिवाळीत असल्यामुळे सगळे विद्यार्थी मिळून दिवाळीआधीच सेलिब्रेशन करतात. शिक्षिका वर्गात येताच पार्टी पॉपर फोडून तिचे स्वागत करतात. त्यानंतर सगळे विद्यार्थी आणि शिक्षिका एकमेकांचा हात पकडून केक कापतात. त्यानंतर काही विद्यार्थी शिक्षिकेला हाताने बनवलेले कार्ड्स, शुभेच्छा देताना दिसतात. या सगळ्या गोष्टी पाहून शिक्षिकेच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील बघण्यासारखा असतो. कशाप्रकारे विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला त्यांच्या वाढदिवसाचे सरप्राईज दिले एकदा तुम्हीसुद्धा बघा.
खास, मौल्यवान सरप्राईज दिले (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bhaavvika_p या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शिक्षिकेने या खास सेलिब्रेशनचा व्हिडीओ पोस्ट करून तिच्या भावना कॅप्शनमध्ये मांडल्या आहेत. “मी खरंच खूप भावूक झाले आहे आणि माझ्या वाढदिवस इतक्या सुंदर पद्धतीने साजरा केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. दिवाळी सुट्टीत माझा वाढदिवस येतो, तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी इतकं छान प्लॅनिंग करून मला खूप खास, मौल्यवान सरप्राईज दिले.
व्हिडीओ नक्की बघा…
तुमच्या गोड शुभेच्छा, हाताने बनवलेले कार्ड्स, सरप्राईजेस आणि हसरे चेहरे हे सगळं माझ्या मनाला खूप भावलं. तुम्हा सगळ्यांमुळे मला जाणवलं की, माझ्याकडे किती सुंदर विद्यार्थी आहेत, जे माझा प्रत्येक दिवस खास आणि आनंदी बनवतात. तुमच्या प्रेम, काळजी आणि प्रयत्नांसाठी मनापासून धन्यवाद. या सुंदर आठवणी मी नेहमी माझ्याजवळ जपून ठेवेन” ; अशी कॅप्शन दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत आणि “शिक्षिकेसाठी ही सगळ्यात बेस्ट फिलिंग असते” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
