Swiggy Delivery Dad And Daughter Viral Video : मुलांच्या आयुष्यात आधारस्तंभ म्हणजे बाबा. आईप्रमाणे प्रेम व्यक्त करू शकत नसेल तरीही मुलांना त्यांच्यापेक्षा चांगले जीवन अनुभवता यावे यासाठी ते दिवसरात्र धडपडत असतात. जितका दरारा तितकंच प्रेम असणारी ही व्यक्ती आपल्या मुलांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याच्या प्रयत्नात असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये बाबा आपल्या मुलांसाठी काय करू शकतात याचे आणखीन एक उदाहरण पाहायला मिळाले आहे.

@abhigya_s या इन्स्टाग्राम युजरला एक अनोख दृश्य पाहायला मिळाले. स्विगीचा टी-शर्ट घातलेला डिलिव्हरी बॉय इमारतीच्या लिफ्टजवळ बसलेला दिसतो आहे. त्याच्या शेजारी त्याची लेक सुद्धा बसलेली असते. तर स्वीगीसाठी डिलिव्हरी देणारे बाबा तिला तिच्या अभ्यास घेताना दिसत आहेतकॅप्शननुसार . बाबा प्रत्येक डिलिव्हरीच्या वेळी आपल्या मुलीला बरोबर घेऊन जातात आणि ऑर्डर दरम्यान, रस्त्यावर, इमारतींमध्ये जिथे शक्य असेल तिथे तिला शिकवण्यास सुरुवात करतात; जे पाहून तुमच्याही डोळ्यांत नक्की पाणी येईल.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @abhigya_s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “भेटा या स्वीगी डॅडला. या बाबांचं प्रेम फक्त शांत आणि मजबूत नाही. अभिमानास्पद आहे. खांद्यावर आपल्या मुलीला बसवून, हसत-खेळतडिलिव्हरी करणे आणि येता-जाता तिचा अभ्यास घेणे. त्यांच्या खंबीरपणाचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांचा हसरा चेहरा आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती आसपासच्या प्रत्येकाला प्रेरणा देते” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

तसेच व्हिडीओ पाहून युजर्स सुद्धा @swiggyindia, तुमच्या टीममध्ये खरोखरच हिरो असतात”, “प्रत्येक सुपरहिरो कॅप घालत नाही आणि जसे की वडील”, “अनेक लोक @swiggyindia ला टॅग करून त्यांना अजिबात काळजी वाटत नाही! किती निराशाजनक आहे”, “एका वडिलांची एकमेव इच्छा असते की, आपल्याला जे मिळालं नाही ते आपण मुलांना द्यायला पाहिजे”, “मी या स्वीगी डिलिव्हरी बॉयला पाहिले आहे. तो खूप नम्र आणि प्रेरणादायी आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.