Viral Video Woman Selling Cucumbers to Express Passengers : अगदी सफाई कामगार असो किंवा एखाद्या कंपनीचा मालक कोणाकडेही कष्ट करण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. कारण- प्रत्येकाला सर्वच क्षेत्रांत चढ-उतार, स्पर्धा, यश-अपयश यांना सामोरं जावे लागते. त्यामुळे तुमच्यात कोणत्याही परिस्थितीत कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीला सकारात्मकरीत्या सामोरं जाता येतं. आज याचं प्रात्यक्षिक व्हायरल व्हिडीओत बघायला मिळालं आहे, ज्यामुळे तुमचे डोळे पाणावतील एवढं तर नक्की…
मुंबई लोकल असो किंवा एक्स्प्रेस तुम्हाला प्रवासात विविध खाद्यपदार्थ विकणारे छोटे-छोटे व्यापारी दिसतील. तर व्हायरल व्हिडीओतसुद्धा एक्स्प्रेसवरच्या समोर ट्रॅकवर उभी राहून एक तरुणी काकडी विकत असते. ट्रॅकच्या मधोमध उभं राहून, पटापट काकडीची साल सोलून, त्याचे छोटे छोटे तुकडे करून, त्यावर मीठ-मसाला टाकून ते ग्राहकाच्या हातात सोपवताना दिसते आहे. यादरम्यान एकीकडे एक्स्प्रेस सुटणार तर नाही ना, किंवा ज्या ट्रॅकवर उभी आहे तिकडून लगेच दुसरी गाडी तर येणार नाही ना याची भीती आणि दुसरीकडे ग्राहकाला काकडी देण्याची घाई तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे.
कष्ट, मेहनत, स्वाभिमानाने जगणं जणू ह्यांचाकडून शिकलं पाहिजे… (Viral Video)
एखादं लक्ष्य पूर्ण करायला जसं आपण संपूर्ण वर्षभर मेहनत घेत असतो. तसेच स्टेशनवर ट्रेन थांबली आहे तोपर्यंत ग्राहकांना खाद्यपदार्थ विकणे हेसुद्धा या छोट्या व्यापाऱ्यांसाठी लक्ष्च असतं. त्यातही काही व्यापाऱ्यांकडे सुटे पैसे नसतात, मग त्यासाठी इतर व्यापाऱ्यांकडून किंवा स्वतःच्या पाकिटातून पैसे शोधून त्यांना सोपवावे लागतात तेही एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवरून सुटण्याआधी. तर व्हायरल व्हिडीओतसुद्धा ही तरुणी कुटुंबाचे आणि स्वतःचे पोट भरण्यासाठी जीवाची बाजी लावून काकड्या विकताना दिसते आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vishwa_9696k या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय मिळत नसते…’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “ताई तुझ्या जीवनात तुला जोडीदार चांगला भेटू”, “स्त्रीशक्तीला सलाम”, “कष्ट, मेहनत, स्वाभिमानानं जगणं जणू ह्यांच्याकडून शिकलं पाहिजे”, “लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वाभिमानानं केलेलं काम बरं”, “पोट भरण्यासाठी समोर येईल ते काम करावं लागतं. चांगला असो वा वाईट” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.