V60e 5G Launched Today : नवीन स्मार्टफोन घेताना आपण सगळ्यात आधी बजेट ठरवतो आणि मग त्यानंतर बजेटमध्ये बसणारा स्मार्टफोन शोधण्यास सुरुवात करतो. मग त्यानंतर आपण कॅमेरा, बॅटरी, स्टोरेज आदी विविध गोष्टींकडे वळतो. तर तुम्हालाही ३० हजाराहून कमी किंमतीत एखादा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…
Vivo कंपनी आज V60e 5G लाँच करणार आहे.कंपनीने म्हटले आहे की, Vivo V60e हा भारतातील पहिला फोन आहे जो AI फेस्टिव्हल पोर्ट्रेट, एआय फोर सीझन पोर्ट्रेट आणि इमेज एक्सपेंडर फीचर्सने सुसज्ज आहे; जो खरेदीदारांना आकर्षित करू शकतो. म्हणूनच, जर तुम्ही स्वस्तात मस्त आणि जबरदस्त कॅमेरा असणारा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Vivo V60e बद्दलची सगळी माहिती अगदी शेवटपर्यंत वाचा…
डिझाईन – Vivo V60e 5G ची डिझाइन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Vivo V60 मॉडेलसारखीच असणार आहे. यात गोळीच्या आकाराचा कॅमेरा, ज्यामध्ये दोन कॅमेरा लेन्स दिला आहे. स्मार्टफोन एलिट पर्पल आणि नोबल गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाईल.
डिस्प्ले – याव्यतिरिक्त, Vivo V60e धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी IP68 आणि IP69 रेटिंग करण्यात आला आहे. त्याचबरोबर 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले; जो 120Hz रिफ्रेश रेट, FHD प्लस रिझोल्यूशन आणि डायमंड शील्ड ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
पोस्ट नक्की बघा…
पर्फोमन्स – Vivo V60e 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० चिपसेट ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत अंतर्गत स्टोरेज असेल देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे हा फोन अँड्रॉइड १५ वर आधारित फनटच ओएस १५ वर चालणार आहे.
कॅमेरा – स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल; ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सह 200MP चा मेन कॅमेरा आणि 30x सुपरझूम असेल. यामध्ये 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा, ऑटो फोकससह 50MP चा सेल्फी कॅमेरा, एआय फेस्टिव्हल पोर्ट्रेट, एआय फोर-सीझन पोर्ट्रेट, एआय इमेज एक्सपेंडर यासारखे कॅमेरा फीचर्स देखील असू शकतात.
बॅटरी लाईफ – स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी; जो 90W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो.
किंमत – स्मार्टफोन 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी २८,७४९ या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.