11-Year-Old boy Saves Pet Dog In Elevator: ‘देव तारी त्याला कोण मारी’ असं म्हटलं जातं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याचा पुन्हा प्रत्यय येईल. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची तंतोतंत प्रचिती देणारा हा व्हिडिओ आहे. एका चिमुकल्यानं या कुत्र्याचा जीव वाचवला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक जण या मुलाच्या प्रसंगावधानाचं कौतुक करत आहे. इमारतीच्या लिफ्टचा दरवाजा उघडल्यानंतर या मुलाला कुत्रा दोरीला लटकलेला दिसला. हा कुत्रा संकटात असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि आधी तो घाबरला; पण नंतर प्रसंगावधान राखत त्यानं या कुत्र्याचा पट्टा सोडवला आणि त्या कुत्र्याला जवळ घेतलं.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साधारण ११ वर्षे वय असलेला एक मुलगा लिफ्टमध्ये जात आहे. तेवढ्यात त्याचा पाळीव कुत्रा गळ्यातील पट्टा जमिनीवर ओढत त्याच्या मागे येतो. मुलगा लिफ्टमधील आरशात पाहण्यात मग्न झालेला. त्यामुळे कुत्राही आपल्या मागे आला आहे, याची त्याला कल्पना नसते. कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा लिफ्टच्या दारातच असतो, इतक्यात लिफ्ट बंद होते. कुत्र्याच्या गळ्यात बांधलेला पट्टा लिफ्टमध्ये अडकतो. लिफ्ट वर जाऊ लागते आणि श्वान त्याच्यासोबत ओढला जाऊ लागतो.यात एका चिमुकल्याने मोठं धाडस दाखवत आपल्या पाळीव श्वानाचा जीव वाचवला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>आनंदाच्या क्षणाला गालबोट! जेंडर रिवील पार्टीत कोसळलं विमान! थरारक VIDEO पाहुण्यांच्या कॅमेरात कैद

व्हिडिओवर अनेक जणांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यात या छोट्या मुलाचं कौतुक केलं आहे. या मुलानं ही परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली त्याचं खरंच कौतुक करावं थोडंच आहे, अशी कमेंट एका युजरनं केली आहे. या कुत्र्याचं दैव बलवत्तर म्हणून मुलगा तिथं आला आणि त्यानं त्याला वाचवलं, असं आणखी एका युजरनं लिहिलं आहे. कोणी काही म्हणो, पण खरोखरच हा मुलगा या कुत्र्यासाठी त्या वेळेस देवदूत बनून आला. तो नसता तर या मुक्या प्राण्याचा जीव हकनाक गेला असता हे मात्र नक्की.