Viral video: हल्ली प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातले चांगले क्षण आठवणीत राहतील असे काहीतरी करायचे असते. यासाठी काहीजण अनेक वेगवेगळ्या आयडीया शोधून हे क्षण अविस्मरणीय बनवतात. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर घडणाऱ्या चांगल्या गोष्टी या आयुष्यभर लक्षात राहतील यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो. मात्र कधी कधी उत्साहाच्या भरात हेच आनंदाचे क्षण दुख:त बदलतात, असाच एक प्रकार आता समोर आला आहे.सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका जोडप्याने आपलं जन्माला येणारं बाळ मुलगा आहे की मुलगी हे सांगण्यासाठी आयोजित केलेल्या जेंडर रिवील पार्टीत मोठी दुर्घटना घडली आहे. या आनंदाच्या क्षणाला गालबोट लागलं आणि त्यात एकाच मृत्यू झाला. 

आनंदाच्या क्षणाला गालबोट!

justin trudeau,
जस्टिन ट्रुडो यांच्यासमोरच खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, भारताकडून निषेध; कॅनडाच्या उच्चायुक्तांना पाठवले समन्स
Bomb threat at Mumbai airport case registered
मुंबई : विमानतळावर बॉम्बची धमकी, गुन्हा दाखल
layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, अद्याप या जोडप्याची ओळख पटलेली नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे कपल ‘ओह बेबी’ या चिन्हासमोर एकमेकांचे हात हातात घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. एक विमान वरून रंग पसरवताना दिसते. यानंतर लोकांच्या ओरडण्याचा आवाज येतो. प्रत्यक्षात व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला कळेल, हे विमान नियंत्रणाबाहेर गेले होते. हे विमान नारळाच्या झाडा धडकून खाली कोसळले. स्थानिक बातम्यांनुसार, अधिकाऱ्यांना नंतर पायलट ढिगाऱ्यात सापडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे पायलटला मृत घोषित करण्यात आले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Traffic मधून बाहेर पडण्यासाठी रिक्षाचालकाचा जबरदस्त जुगाड; काय केलं एकदा VIDEO पाहाच

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, ‘पायलटची अजिबात पर्वा न करता कॅमेरा ज्या प्रकारे जोडप्याकडे वळवला गेला ते दुःखद आहे.’ दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले: ‘क्षणभर मला वाटले की त्यांनी विमान पाहिले कारण सर्व किंचाळत आहे. पण नाही, हे फक्त कॅमेरामनच्या लक्षात आलेले दिसते.