Viral Video: आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षण साठवून ठेवण्यासाठी लोक फोटो, व्हिडीओ यांची मदत घेत असतात. प्रपोझ करण्यापासून ते लग्नापर्यंत प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यावर आजकाल लोक भर देत असतात. लग्नासाठी आपल्या जोडीदाराला प्रपोझ करताना बरेचसे लोक नर्व्हस होतात. समोरची व्यक्ती आपल्या मागणीला काय प्रतिसाद देईल हे जाणून घेताना प्रत्येक मुलाच्या मनात धाकधुक असते. प्रपोझ करताना काही गडबड होऊ नये यासाठी लोक प्रयत्न करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या प्रेयसीला लग्नासाठी मागणी घालत असल्याचे पाहायला मिळते. पण या प्रयत्नामध्ये असं काही घडतं की ज्यामुळे त्याची पार फजिती होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या प्रेयसीसह एका छोट्या बोटीमध्ये असल्याचे दिसते. आजकाल तरुण कपल्स सेलिब्रेशनसाठी, एकांतात वेळ घालवण्यासाठी अशा छोट्या क्रूझवर फिरायला जात असतात. व्हिडीओच्या सुरुवातीला ते दोघेजण टायटॅनिक सिनेमातील लोकप्रिय पोझमध्ये उभे राहतात. त्या क्रूझवर त्यांच्या पायाशी गुलाबाच्या पाकळ्या पाहायला मिळतात. टायटॅनिक पोझ दिल्यानंतर तो तरुण मागे वळतो आणि गुडघ्यावर बसायला लागतो. ते पाहून त्याच्या प्रेयसीला सुखद धक्का बसतो. प्रपोझ करण्यासाठी डाव्या खिश्यातून अंगठी काढत असताना तरुणाच्या हातातून ती अंगठी निसटते आणि समुद्रामध्ये पडते. अंगठी मिळवण्यासाठी तो लगेच पाण्यामध्ये उडी मारतो.

आणखी वाचा – सिंहीणीच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये लोकांनी केली गर्दी, केक आणल्यावर केला Prank; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

@cctvidoits नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. फक्त ११ सेकंदाचा हा व्हिडीओ ७ मिलियनपेक्षा जास्त यूजर्सनी पाहिला आहे. ३०,००० पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. व्हिडीओखाली कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका यूजरने ‘बिचाऱ्याने घेतलेली मेहनत काही सेकंदांमध्ये वाया गेली’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘ही गोष्ट ते दोघे लवकर विसरु शकणार नाही’ असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While proposing on cruise boat in sea mans propose ring fell into seawater jumps into sea see netizens hilarious watch full viral video yps