Woman Crashes Car into Hotel: हॉटेलसमोर सगळं अगदी नॉर्मल चाललं होतं… पण, काही क्षणांतच शांततेचं रूपांतर गोंधळात आणि दहशतीत झालं! कारण, फाईव्ह स्टार हॉटेलच्या गेटपाशी एका महिला वकिलाने असा काही ‘स्टंट’ केला की सगळे पाहणारे थक्क झाले. एका क्षणाच्या चुकीमुळे काय घडू शकतं, याचा धक्कादायक अनुभव त्या दिवशी अनेकांनी घेतला आणि आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या CCTV VIDEO ला लाखोंच्या घरात व्ह्युज मिळत आहेत.

“हे खरंच घडलंय का?” असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचाराल, कारण जे घडलं ते एखाद्या अ‍ॅक्शन सिनेमाच्या क्लायमॅक्ससारखं होतं. एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या मुख्य गेटवर, जिथं महागड्या कार्सची रेलचेल असते, तिथं अचानक अशी घटना घडली की उपस्थित लोकांचा थरकाप उडाला आणि सोशल मीडियावर त्याचा VIDEO अक्षरशः धुमाकूळ घालतोय.

ही घटना घडली एका नामांकित हॉटेलच्या बाहेर, जिथे महिला वकील गाडी घेऊन गेस्ट पिकअप पॉईंटवर थांबली होती. वातावरण अगदी निवांत होतं, लोक गप्पा मारत होते, काही गाड्या पार्क होत होत्या… आणि तेवढ्यात अचानक काही तरी विचित्र घडलं.

कारने रिव्हर्स घेतली… आणि थेट हॉटेलच्या दरवाज्यात घुसली!

व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, महिला वकिलाची महागडी कार अचानक वेगात रिव्हर्स घ्यायला लागते आणि काही क्षणांतच ती थेट काचांच्या मुख्य दरवाज्यावर आदळते. कार इतक्या वेगात होती की ती थेट हॉटेलच्या आतमध्ये शिरली. कारची टक्कर एवढी जोरात होती की संपूर्ण दरवाजा तुटून काचांचे तुकडे सगळीकडे उडाले… आणि कार हॉटेलच्या आतपर्यंत घुसली.

आजूबाजूचे लोक एकदम घाबरले, काही जण किंचाळले, तर काही जण गडबडीत एकमेकांना बाजूला खेचू लागले. या अपघातात सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालं नाही. समोर उभी असलेली दुसरी कार थोडीशी डेंट झाली, पण तिथे उभे असलेले लोक थोडक्यात बचावले.

संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता सोशल मीडियावर लोक हसून बेजार होत आहेत. एक युजर म्हणतो, “हॉटेलवाल्यांची चूक आहे, रस्त्यातच हॉटेल का ठेवलं?”

येथे पाहा व्हिडीओ

@Deadlykalesh या एक्स हँडलवरून शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी गमतीशीर कमेंट्स केल्या आणि काहींनी तर म्हटलं, “या वकील महिलेचं ऑफिस आता थेट हॉटेलात ओपन झालंय की काय?”…..