मुंबई लोकल, बसप्रमाणे दिल्लीमध्येही मेट्रो आणि बसमध्ये मारहाणीच्या घटना सातत्याने घडत असतात. रोज कुठे ना कुठे अगदी क्षुल्लक कारणांवरून बाचाबाची, मारहाण असे प्रकार घडत असतात. त्यात सीटवर बसण्यावरून तर नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात. असाच एक प्रकार दिल्लीतील डीटीसी बसमध्ये घडला आहे. बसमधील सीटवर बसण्यावरून अनेक महिलांमध्ये आधी बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्या बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ, फ्री स्टाईल हाणामारीत झाले. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात महिलांची झालेली मारामारी तुम्ही कधी पाहिली नसेल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ दिल्लीतील डीटीसी बसमधील आहे. त्यात तुम्ही पाहू शकता की, काही महिला आपापसांत खूप वाईट पद्धतीने भांडताना दिसत आहेत. दोघी एकमेकींचे केस पकडून जोरजोरात ओढत आहेत. त्यात एका महिलेने बेल्ट काढून मारण्यास सुरुवात केली. यावेळी काही लोकांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला; पण कोणीही थांबले नाही. व्हि़डीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलांची सुरू असलेली ही हाणामारी पाहून त्यांच्याबरोबर असलेली मुले खूप घाबरली आणि रडू लागली. तरीही या महिला एकमेकांना केस पकडून मारत होत्या. एका महिलेने तर मारण्यासाठी हातात बेल्टही घेतला होता. अनेक मिनिटे ही हाणामारी अशीच सुरू होती.

लोकांनी हाणामारी पाहण्याचा लुटला आनंद

हेही वाचा – रामलीलाच्या मंचावर जेव्हा १० तोंडांचा रावण गुटखा खातो…; पाहा Viral video

हा व्हिडोओ @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ही हाणामारी सीटवर बसण्यावरून झाल्याचे म्हटले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स भन्नाट भन्नाट कमेंट्स करीत आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय की, सुरक्षित काळे माझे केस, वायस्मॉलने केला चमत्कार! तर दुसऱ्या युजरने लिहिले/ की, दिल्ली मेट्रोच्या प्रचंड यशानंतर आता डीटीसीने सादर केली ही हाणामारी.