एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा सणांदरम्यान अनेकदा दुकानांतून विविध प्रकारच्या मिठाया खरेदी केल्या जातात. मिठाईचा आपण अगदीच आवडीने आस्वाद घेत असतो. अनेकदा रसगुल्ला किंवा गुलाबजाम हे गोड पदार्थ डब्यात पॅक करून दिले जातात. हे पदार्थ खरेदी करताना त्याच्यावर असणारी एक्स्पायरी डेट आपण अनेकदा तपासून पाहतो. पण, आतमध्ये पदार्थ कसा असेल याची आपल्याला जाणीव नसते. सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका तरुणाने मिठाईच्या दुकानातून गुलाबजामचा एक डबा विकत घेतला आणि त्याला एका गुलाबजामवर किडा दिसून आला.
सोशल मीडियावर एका तरुणाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तरुणाच्या हातात डबा आहे आणि त्यात काही गुलाबजाम आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की, त्यातील एका गुलाबजामवर छोटा पांढरा किडा फिरताना दिसतो आहे. तरुणाने चेन्नईमधून हा मिठाईचा डबा खरेदी केला होता. दुकानात मिठाई पॅक करणाऱ्या कामगारांच्या हातून घडलेल्या निष्काळजीपणाचे हे एक मासलेवाईक उदाहरण आहे. तसेच तरुणाने गुलाबजामवर असणारा किडा दाखवत डब्यावर लिहिलेले दुकानाचे नावही व्हिडीओ बनवीत शेअर केले आहे.
हेही वाचा…चीनचा अनोखा जुगाड! आता विद्यार्थ्यांना शाळेत झोपता येणार, बनवले खास ‘डेस्क’; पाहा व्हायरल व्हिडीओ
व्हिडीओ नक्की बघा :
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करून तरुणाने गुलाबजामचा बॉक्स तमिळनाडूतील चेन्नई येथील अशोकनगर नावाच्या मेट्रो स्थानकावरून खरेदी केला, असे सांगत, पत्ताही त्याने कॅप्शनमध्ये नमूद केला आहे. तसेच युजरने गुलाबजामवरील किडा पाहून त्याने दुकानदाराकडे तक्रारसुद्धा केली; पण तिथून त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दुकानाकडून रिप्लाय आला, असेसुद्धा त्याने नेटकऱ्यांशी संवाद साधताना कमेंटमध्ये नमूद केले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @tn38_foodie या युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. गुलाबजामवरील किडा पाहून तरुणाने कॅप्शनमधून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून, “नवीन भीती अनलॉक केली” अशीसुद्धा एका युजरने कमेंट केली आहे. तसेच या संदर्भात युजरला अनेक नेटकरी विविध प्रश्न विचारताना दिसत आहेत. तसेच युजरदेखील अगदीच शांतपणे त्यांना उत्तरे देताना दिसत आहे.