scorecardresearch

Premium

चीनचा अनोखा जुगाड! आता विद्यार्थ्यांना शाळेत झोपता येणार, बनवले खास ‘डेस्क’; पाहा व्हायरल व्हिडीओ

मुलांच्या बौद्धिक वाढीस आणि एकूणच मानसिक आरोग्यास समर्थन देण्यासाठी विश्रांतीचे महत्त्व ओळखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

In Chinese schools innovative desks turned beds help kids nap in classes
चीनच्या शाळांमध्ये बेडमध्ये रुपांतर होणारे 'डेस्क' बसवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य- @ViralXfun एक्स(ट्विटर))

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करणे ही शिक्षकांची आणि शाळेची जबाबदारी असते. विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. यासाठी जगभराती शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. चीनमधील शाळेमध्ये राबवलेल्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. चीनच्या शाळांमध्ये बेडमध्ये रुपांतर होणारे ‘डेस्क’ बसवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनात आणि लक्ष केंद्रीत करण्याच्या क्षमतेमध्ये सकारात्मक बदल लक्षात घेऊन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालक आणि शिक्षकांनी स्वागत केले आहे.

विद्यार्थ्यांची तंदुरुस्ती आणि मानसिक विकासाला प्राधान्य देण्यासाठी, चीनमधील काही शाळांनी पारंपारिक वर्गामध्ये एक सकारात्मक बदर केला आहे. चिनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना झोपता यावे यासाठी खास ‘डेस्क’ तयार केले आहे जे काही मिनिटांत बेडमध्ये रूपांतरित होतात.

WhatsApp soon allow users to filter favourite chats from the clutter streamline and prioritise important conversations
व्हॉट्सॲप घेऊन येतंय तुमच्यासाठी भन्नाट फीचर; आता युजर्सना आवडत्या व्यक्ती अन् संपर्कांना देता येणार प्राधान्य
IAS officer Sonal Goel post on Her cracking UPSC exam Marksheet Must Read her journey and shared valuable advice
“तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा…” विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी IAS अधिकाऱ्याने शेअर केली UPSC परीक्षेची गुणपत्रिका
coaching classes latest news in marathi, coaching classes start up status marathi news, coaching classes ban marathi news
बंदी कसली… कोचिंग क्लासेसना ‘स्टार्टअप’ दर्जा द्या
how not to charge electronic vehicle batteries
Electric vehicle tips : या गाड्यांना कधीच करू नका १०० टक्के चार्ज! पाहा चार महत्त्वाच्या चार्जिंग टिप्स

हेही वाचा – पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये सीटची उशी झाली गायब! एअरहोस्टेस म्हणाली, “सीट खाली शोधा”

हे ‘डेस्क’ने शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये नव्याने भर टाकली आहेत, ज्यामुळे मुलांना ठरवून दिलेल्या विश्रांती कालावधीत झोप घेता येते. हे ‘डेस्क’ फोल्ड करण्यायोग्य आहेत.

मुलांच्या बौद्धिक वाढीस आणि एकूणच मानसिक आरोग्यास समर्थन देण्यासाठी विश्रांतीचे महत्त्व ओळखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “चीनमध्ये शिक्षणाकडे अधिक सर्वांगीन दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे याबाबत जागरूकता वाढत आहे. आणि, हा उपक्रम शिकण्याच्या प्रक्रियेवर बदल दर्शवितो, शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे शैक्षणिक यशाशी जोडलेले आहे यावर जोर दिला जात आहे.”

हेही वाचा – “आईवर ओरडू नका”; पालकांच्या भांडणात चिमुकलीने घेतली धाडसी भूमिका, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

एक्सवर(ट्विटर) एकाने लिहिले, “अशी शाळा असती खरचं असावी असे मला वाटते,”. दुसरा म्हणाला, “काय नाविन्यपूर्ण ‘डेस्क सिस्टम’. “हे खरोखरच विद्यार्थ्यांना आरामादायी आणि शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार केले आहे.”

तिसऱ्याने प्रतिसाद दिला, “काश, आमच्याकडे ते कामाच्या ठिकाणी असते!”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In chinese schools innovative desks turned beds help kids nap in classes snk

First published on: 28-11-2023 at 16:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×