Yogi Adityanath Mangalsutra Comment Viral Video: लोकसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांची मंगळसूत्र कमेंट बरीच चर्चेत आली होती. यावरून विरोधकांनी तर मोदींना लक्ष्य करत टीका केल्या आहेत, पण आता लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा एक व्हिडीओ व्हायरल होताना आढळून आलाय की ज्यामुळे तुमच्याही भुवया उंचावल्या जातील. व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिसत होते. पुलवामा हल्ल्यातील विधवांनी गमावलेल्या मंगळसूत्रांबद्दल ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून प्रश्न विचारताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. नेमकं या व्हिडीओमागे किती तथ्य आहे हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Shyam Gupta RPSU ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही गूगल कीवर्ड सर्च वापरून तपास सुरू केला. आम्हाला हिंदुस्तान टाईम्सच्या वेबसाइटवर अपलोड केलेली बातमी सापडली. रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा नेत्या डिंपल यादव यांच्या ‘मंगळसूत्र टिप्पणी’वर जोरदार प्रत्युत्तर दिले.

https://www.hindustantimes.com/cities/lucknow-news/yogi-hits-back-on-dimple-s-mangalsutra-remark-101714069712008.html

हा व्हिडिओ मैनपुरी येथील असावा, असे एका अहवालात म्हटले आहे.

आम्ही गूगल कीवर्ड सर्च चा वापर करून शोधल्यावर आम्हाला ANI च्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील इटावा येथे एका प्रचारसभेत बोलत होते.

१३ मिनिट ३२ सेकंदाच्या स्टॅम्पवर ते ‘मंगळसूत्रा’ बद्दल बोलू लागतात. त्यानंतर योगी आदित्यनाथ सुमारे १४ मिनिटे ३९ सेकंदाच्या स्टॅम्पवर सपा नेत्या डिंपल यादव यांच्याबद्दल बोलतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंगळसूत्राच्या टिपण्णीवर येथील एका सपा नेत्याने व्यंग्यात्मक वक्तव्य केले आहे. पुलवामा हल्ल्यातील विधवांच्या मंगळसूत्रांचे काय झाले, असा प्रश्न त्या मोदीजींना विचारत आहेत. आम्ही समाजवादी पक्षालाही विचारू इच्छितो की, कारसेवकांच्या पत्नींच्या मंगळसूत्राचे काय झाले?”

आम्हाला ANI च्या X अकाउंटवर ही ३८ सेकंदाची व्हिडीओ क्लिप देखील सापडली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये ‘एक हास्यास्पद बयान समाजवादी पार्टी की नेत्री का आया, उनके द्वारा कहा जाराहा है, की मोदीजी’ हे विधान क्रॉप करण्यात आले आहे आणि एडिटेड आवृत्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली आहे.

हे ही वाचा<< सीता रामाच्या मंदिरात चिकनचं दुकान, राहुल गांधींकडून उद्घाटन? Video वर प्रचंड संताप, घटनेचं खरं मूळही भीषण

निष्कर्ष: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘मंगळसूत्र’ टिप्पणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला नाही. सीएम योगी यांचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल दावे खोटे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi adityanath questions pm modi over mangalsutra comment in viral video in reality he took name of karsevak not pulwama martyrs watch svs
Show comments