बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. रणवीरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राइज मिळालं आहे. निर्माता करण जोहरने त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली असून या सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट्टची जोडी झळकणार आहे.

करण जोहरने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या त्याच्या आगामी सिनेमातची घोषणा केली आहे. करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत रणवीर- आलियाच्या चाहत्यांना ही खुशखबर दिलीय. या सिनेमात रणवीर आणि आलिया मुख्य भूमिकेत झळकणार असून २०२२ सालात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कथा शशांक खेताना, इशिता मोइत्रा आणि सुमित रॉय यांनी लिहिली आहे.

हे देखील वाचा: “७५ वर्षांची म्हातारी दिसतेयस”; करीना कपूरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

या आधी जोया अख्तरच्या ‘गली बॉय’ सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट्टची जोडी झळकली होती. सिनेमातील या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा रणवीर-आलियाला पाहण्यासाठी आता चाहते उत्सुक आहेत. यासोबतच रणवीर आणि आलिया करण जोहरच्या ‘तख्त’ या सिनेमातही एकत्र झळकणार आहेत.मात्र सध्या या सिनेमाच्या प्रोजेक्टचं काम पुढे ढकलण्यात आलंय.
दरम्यान रणवीर सिंहचा कपिल देव यांचा बायोपिक असलेला ’83’ हा सिनेमा देखील प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या सिनेमात रणवीर आणि दीपिकाची जोडी झळकणार आहे.