वसई- क्लासला जाणार्‍या १७ वर्षीय तरुणीवर एका अनोळखी रिक्षाचालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार वसईत उघडकीस आला आहे. वालीव पोलीस या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित मुलगी वसई पूर्वेला राहते. बुधवार १७ जुलै रोजी ती घरातून संगणक क्लासला जाण्यासाठी निघाली होती. पुर्वेला ती एका रिक्षात बसली. तिच्या पायाला असलेले व्यंग रिक्षाचालकाने हेरले. बोलण्यात तिच्या विश्वास संपादन करून तुझे व्यंग ठिक करणारे औषध असल्याची थाप मारली. त्यामुळे मुलीचा विश्वास बसला. त्याने तिला क्लासला न नेता शिरसाड फाटा येथून वज्रेश्वरी येथील एका लॉजवर नेले. उपचाराच्या नावाखाली त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. मात्र नंतर पीडित तरुणी घाबरून तेथून निघून आली. नंतर हा प्रकार तिने आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वालीव पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(२), ७४ सह पोक्सो कायद्याच्या कलम ८,९ (के) १०, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>विरार पोलिसांच्या धमकीमुळे आत्महत्या, १० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे मानवाधिकार आयोगाचे आदेश

आरोपी रिक्षाचालक हा सुमारे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील आहे. आम्ही त्या मार्गावरील सीसीटीव्ही आणि लॉज तपासत आहोत अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुंभार यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor girl was sexually assaulted by a rickshaw puller vasai amy