वसई- अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या ८० च्या दशकात गाजलेल्या शान सिनेमातील ठकसेनांच्या पात्रांप्रमाणे लोकांना ठकविणार्‍या ठकसेनाच्या जोडीला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अटक केली आहे. रस्त्यावर एकटे जाणाऱ्या लोकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्याकडील सोने आणि इतरम मौल्यवान ऐवज लुटायचे. या ठकसेनांच्या जोडीवर मुंबई आणि परिसरात अशा प्रकारच्या ५० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसईत विरार शहरात एका भामट्याच्या जोडीने उच्छाद मांडला होता. लोकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यात गाठून काहीतरी कारण सांगून अडवायचे आणि बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील मौल्यवान ऐवज, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करायची अशी या ठकसेन जोडीची पद्धत होती. १९ ऑगस्ट रोजी विरार मध्ये राहणार्‍या एका ज्येष्ठ नागरिकाला अशाच प्रकारे या ठकसेनांच्या जोडीने लुबाडले होते. या घटनांचे गांभिर्य पाहता गुन्हे शाखा ३ च्या पथकाने तपास सुरू केला होता.

हेही वाचा >>>मित्राने कर्जाचे हप्ते न फेडल्याने व्यापार्‍याने केली आत्महत्या; भाईंदर मधील घटना

पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही चित्रण मिळवले होते. त्यावरून आरोपींची ओळख पटवली आणि हे दोघे कुख्यात ठकसेन असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने रमेश उर्फ रम्या जैस्वाल (४६) आणि विशाल उर्फ बल्ला उर्फ बाळू कश्यप (२८) या दोन ठकसेनांना अटक केली. त्यांच्याकडून वसईतील अशा प्रकारचे दोन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले. त्यांनी मुंबई आणि परिसरात ५० हून अधिक गुन्हे केल्याची माहिती गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिले.

हेही वाचा >>>जूचंद्र येथील रांगोळीकार संजय पाटीलने स्पेनमध्ये साकारली रांगोळी

शान सिनेमाच्या धर्तीवर ठकसेनगिरी

१९८० च्या दशकात शान सिनेमा गाजला होता. यामध्ये अमिताभ बच्चन आणि शशी कपूर ही ठकसेनांची जोडी लोकांना गंडवायची. त्याच धर्तीवर जैस्वाल आणि कश्यम यांची जोडी लोकांना फसवत होती.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A thief who robbed people with sleight of hand was arrested amy