भाईंदर : मिरा भाईंदर मधील नागरिकांना नाट्यगृहाकडे आकर्षित करण्यासाठी यंदा पुन्हा दिवाळीनिमित्त नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी नागरिकांना विनामूल्य नाटकाचे प्रयोग पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.
मिरा भाईंदर महापालिकेने नव्याने उभारलेल्या भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाला मागील वर्षभरापासून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.त्यामुळे नाट्यगृहाकडे अधिकाधिक नाटक रसिकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेकेकडून नवनवीन प्रयोग केले जात आहे.यात आता आमदार प्रताप सरनाईकांकडून देखील नवी संकल्पना आखण्यात आली आहे.
त्यानुसार यंदा दिवाळीनिमित्त मिरा-भाईंदर महापालिका आणि प्रताप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यात २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान तीन नाटके आयोजित करण्यात आली आहेत.
तर नाट्यमहोत्सवासाठी प्रवेशिका आमदार प्रताप सरनाईक यांच्या मिरा रोड येथील जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध केली जाणार आहे.यात २४ ऑक्टोबरला ‘कुटुंब कीर्तन’, २५ ऑक्टोबरला ‘घाशीराम कोतवाल’ आणि २६ ऑक्टोबरला ‘नियम व अटी लागू’ या नाट्य प्रयोगांचा समावेश आहे.