वसई : नालासोपार्‍यात राहणार्‍या अल्पवयीन मुलीची अश्लील चित्रफित तयार करून तिच्यावर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी आरोपींना अटक करण्यात आली आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित मुलगी १५ वर्षांची असून नालासोपारा पूर्वेला राहते. १७ जानेवारी रोजी तिच्या घराजवळ राहणार्‍या अयान नावाच्या मुलाने तिला चांद पठाण या मुलाच्या घरी नेले. तेथे दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर चांद पठाण आणि अमीर अन्सारी या दोघांनी तिची अश्लील चित्रफित तयार केली. या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली तर अश्लील चित्रफित वायरल करण्याची धमकी दिली.

यामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी दिला सलमान खान (१९) नावाच्या मुलाचा फोन आला. त्याच्याकडे अश्लील चित्रफित असल्याचे सांगून त्याने तिला ब्लॅकमेल केले आणि आपल्या घरी बोलावले. सलमानने देखील तिच्यावर बलात्कार करून पुन्हा तिची अश्लील छायाचित्रे काढली. अखेर हा प्रकार सहन न झाल्याने तिने गुरूवारी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून पेल्हार पोलिसांनी चौघा आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५ (१), ७०(२), ७४,७७, ७९, ३५१(२) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संऱक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ८, १२ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७(बी) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तनपुरे यांनी दिली.

आरोपी पीडित मुलीच्या परिसरात राहणारे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी वसई न्यायालात हजर केले असता ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप राख यांनी दिली. तक्रार दाखल होताच गुन्हा दाखल करून या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai minor girl gang raped by four persons with threat of her obscene video css