भाईंदर :-मीरा रोड राहणाऱ्या एका  तरुणीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिव्ह ईन रिलेशन मध्ये राहणाऱ्या तिच्या मित्राने ही हत्या केली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मनोज सहानी(५५) आणि सरस्वती वैद्य (३२) हे मीरा रोड येथील गीता नगरच्या गीता आकाश दीप या इमारतीच्या सातव्या मजल्यावर लिविंग रिलेशनशिप मध्ये राहत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले आणि…”, मीरा रोडमधील महिलेच्या हत्याप्रकरणात धक्दादायक माहिती समोर

बुधवारी रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे  शेजारच्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला असता त्यांना त्याठिकाणी सरस्वती वैद्यचा मृतदेहाचे केवळ पाय आढळून आले. आरोपीने धडाची विल्हेवाट लावली होती. हे दोघे मागील तीन वर्षापासून या इमारतीत भाड्याच्या सदनिकेत राहत होते आरोपी सहानी याची बोरीवली मध्ये दुकान आहे. आरोपी सहानी याने करवतेच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली आहे. त्याने मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले त्याचा आम्ही शोध घेत आहोत अशी माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live in partner killed girlfriend in mira road zws