लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांना ठाकरे गटाने खुली ऑफर दिली आहे. नाराज आहात तर आम्हाला मदत आणि आमचा प्रचार असे महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी जाहीरपणे सांगितले. रविवारी भारती कामडी नालासोपारामध्ये प्रचारासाठी आल्या होत्या.

रविवारचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार हे वसई विरार शहरात आहेत। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही पक्षांनी रविवारी वसईत प्रचारासाठी भर दिला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवसेनेच्या भारती कामडी यांनी देखील नालासोपारामध्ये रविवारी प्रचार फेरी काढली. २९ गावे महापालिकेतून वगळणार तसेच ६९ गावांचा पाणी प्रश्न सोडवणार असे आश्वासन त्यांनी दिले. महायुतीने राजेंद्र गावित यांची उमेदवारी नाकारली. त्याबद्दल विचारले असता त्यांच्या पक्षाने कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र राजेंद्र गावित नाराज आहेत तर त्यांनी आम्हाला मदत करावी आणि आमचा प्रचार करावा असेही कामडी यांनी सांगितले. भारती कामडी यांनी गावित यांना दिलेली ही डिवचणारी ऑफर चांगलीच चांगलीच चर्चेत आहे.

आणखी वाचा-नाराज खासदार राजेंद्र गावित प्रचारापासून लांबच, वसईत हेमंत सावरा यांचा प्रचार सुरू

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता आणि ठाकरे गटाचे खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र शिवसेनेतील बंडा नंतर ते शिंदे गटात गेले होते. जर गावित यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नसती तर आज ते पालघर मधील महाविकास आघाडीचे उमेदवार असते असे बोलले जात आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajendra gavit should promote mahavikas aghadi bharti kamadis open offer mrj