विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि अपेक्षेप्रमाणे भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने, सत्तेवर भाजपचा पहिला दावा असणार हे स्पष्टही झाले. १९ ऑक्टोबरपासून ३१ ऑक्टोबपर्यंतचा काळ, हा भाजपच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील ‘वेगळी पाने’ ठरला. या बारा दिवसांत राजकीय मंचावर जेवढय़ा घडामोडी घडल्या, त्यापेक्षाही रंजक घडामोडी पडद्यामागच्या विंगेत घडल्या होत्या. काही अज्ञात साक्षीदारांच्या मदतीने घेतलेला त्या पडद्यामागच्या घडामोडींचा हा वेध..
नवे समीकरण..
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली, निकालांचा कल भाजपच्या पारडय़ात
या घडामोडी सुरू असताना इकडे शिवसेनेच्या गोटात मात्र, साऱ्या नजरा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे खिळल्या होत्या. मातोश्रीवर लगबग सुरू होती. संजय राऊत, सुभाष देसाई, मनोहर जोशी, दिवाकर रावते यांची ये-जा सुरू झाली होती. उद्धव ठाकरे प्रत्येकाशी स्वतंत्र चर्चा करीत होते. सरकारमध्ये सहभागी व्हावे किंवा नाही.. काहीच निर्णय होत नव्हता. भाजप काय भूमिका घेते ते पाहून मगच निर्णय घ्यावा, असे अखेर ठरले. शिवसेनेशी स्वत:हून चर्चा न करण्याचा निर्णय दिल्लीत भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत झाला. पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा हा निरोप राज्यातील संबंधित नेत्यांपर्यंत पोहोचला आणि शिवसेनेपर्यंत ही खबर पोहोचली, मात्र अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेशी चर्चा करीत राहावे, अशी रणनीती दिल्लीत आखली जात होती. शिवसेनेच्या गोटातील आशेचे किरण जिवंत राहावेत, यासाठीच ही रणनीती होती. याच रणनीतीनुसार, जे.पी. नड्डा व राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात जाऊन आमदारांशी चर्चा करावी, असे ठरले. या रणनीतीची अपेक्षित फळेही दिसू लागल्याने भाजपमध्ये समाधानाचे वातावरण होते, तर शिवसेनेतील अस्वस्थता वाढत होती. अखेर, अखंड महाराष्ट्राचे आश्वासन दिले तरच भाजपला पाठिंबा देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मी स्वत:हून पाठिंबा देणार नाही, भाजपने तो मागितला, तरच प्रस्ताव पाहून निर्णय घेऊ, असे ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेनेच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट करून टाकले. भाजपने मात्र त्यावरही मौन पाळले होते. उलट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयावर मात्र मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रतिक्रियाही व्यक्त करून टाकली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आमचे शत्रू आहेत; पण शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र आहे, असे फडणवीस यांनी नागपुरात स्पष्ट केले आणि पुन्हा सेनेच्या काही नेत्यांच्या डोळ्यांत आशा पालवल्या. राष्ट्रवादीने देऊ केलेल्या पाठिंब्याचा निर्णय संसदीय मंडळच घेईल, अशी पुस्ती फडणवीस यांनी जोडली आणि भाजपच्या मनात काय आहे, या चिंतेने सेनेत पुन्हा अस्वस्थता पसरली.. याच अस्वस्थतेत दिवस मावळला, तेव्हा भाजप हा बहुमताच्या सर्वात जवळचा पक्ष असल्याने सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाले होते. पराभव स्वीकारलेल्या काँग्रेसची कार्यालये सुनीसुनी झाली होती, तर भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर जल्लोष सुरू होता. फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई सुरू झाली होती आणि ढोलताशांच्या गजरातच भाजपचा दिवस मावळला होता..
सारे लक्ष ‘मातोश्री’वरच!
बहुमत गाठण्यासाठी गरजेचा असलेला १४५ चा जादूई आकडा भाजपला गाठता आलेला नाही, त्यामुळे नवी राजकीय समीकरणे सुरू होणार हे स्पष्टच झाले होते. सेना भवनात उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित
‘दिवाळी’..
भाजपचे सरकार येणार हे आता स्पष्ट झाले होते. पक्षातही दिवाळी सुरू झाली होती.. देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीवरही जवळपास शिक्कामोर्तब झाले होते; पण पक्षातील काही गटांमध्ये नाराजीनाटय़ाचे नवे अंक सुरू
मुक्काम दिल्ली!
भाजपसोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेलेले शिवसेना खासदार अनिल व सुभाष देसाई हे राजनाथ सिंह व
आशा कायम!
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चित झाली. नेतानिवडीच्या बैठकीच्या आणि
रेशीमबागेत..
सेना-भाजपमधील चर्चा थांबल्याचे स्पष्ट झाले होते. मातोश्रीवर बैठका सुरू होत्या; पण निर्णय होत नव्हता.
आत्मसन्मानाचा आग्रह
भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार, असे भाजपमधील नेते प्रसार माध्यमांना सांगू लागले आणि शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत पुन्हा चर्चेला जोर आला. मातोश्रीवर पुन्हा गुप्त बैठका सुरू झाल्या. उद्धव ठाकरे,
स्नेहमीलन आणि कटुता..
दिल्लीत पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या खासदारांच्या दिवाळी स्नेहमीलनात शिवसेनेचे खासदार अखेर
राष्ट्रवादीचा पाठिंबा
आता या चर्चेतून कायमचा तोडगा काढला पाहिजे, यावर मातोश्रीवरील बैठकीत एकमत झाले आणि उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला. सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी लगोलग दिल्ली गाठून भाजप नेते धमेंद्र
तोडग्याविनाच..
भाजप विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड निश्चित झाली. पक्ष कार्यालयात बैठकीची
पंचाईत!
गुरुवार, ३० ऑक्टोबर : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास सज्ज झालेले देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच दिल्ली गाठून पंतप्रधान व अन्य नेत्यांना शपथविधी सोहळ्याची निमंत्रणे दिली. इकडे मुंबईतही निमंत्रणांचीच धामधूम सुरू असतानाच, उद्धव ठाकरे यांनी निर्णय जाहीर करून टाकला. पक्षाचा योग्य तो सन्मान राखला जात नसल्याने शपथविधीवर शिवसेनेचा बहिष्कार राहील, असे त्यांनी जाहीर केले. उद्याच्या सोहळ्यात शिवसेनेच्या कोणीही आमदार, खासदारांनी उपस्थित राहू नये, असा निरोप पाठविण्याच्या सूचना त्यांनी देसाईंना दिल्या. मात्र, भाजपमध्ये शांतता होती. त्यावर कोणीही कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, असा आदेश दिल्लीतून जारी झाला. शिवसेनेला महत्त्व द्यायचे नाही, असा संकेत मिळावा, अशीच ही व्यूहरचना होती..
अजुनि पाहतोचि वाट..
शपथविधी सोहळ्याची धावपळ सुरू झाली. भाजपचे गावोगावीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होऊ लागले होते.
तूर्त सारे संपले!
शपथविधी सोहळ्याच्या उत्साहात सकाळपासूनच वानखेडे स्टेडियमचा परिसर न्हाऊन निघाला होता. सूर्य
– महाराष्ट्रातील सत्तांतराचे हे बारा दिवस राजकारणाचे नवे रंग लेवून अवघ्या महाराष्ट्राने अक्षरश: साजरे केले. भाजप आणि शिवसेनेच्या २५ वर्षांच्या युतीचे एक पर्व बारा दिवसांत संपुष्टात आले. आता विश्वासदर्शक ठरावाची कसोटी भाजपच्या सरकारने पार पाडली आहे. शिवसेनेसोबत सत्तासहभागाची बोलणी अजूनही सुरू आहेत, असे अधूनमधून एखादा भाजप नेता सांगतो. सेनेतही अजून सहभागाची आस अधूनमधून व्यक्त होते. तसे संकेतही मिळतात; पण सरकारची वाटचाल सुरू झाली आहे..