शिवसेनेच्या इतिहासात बाळासाहेबांप्रमाणेच मनोहर जोशी यांचे स्वतंत्र स्थान आहे. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे.
उद्धवही सल्ला घेतात..
बाळासाहेबांच्या निकट राहण्याची संधी मला सतत मिळाली. त्यांच्यामुळे अनेक पदेही मिळाली. सेनेच्या
बाळासाहेबांचे स्मारक, उद्धव आणि शरद पवार..
शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे स्मारक झाले पाहिजे ही मागणी मीच प्रथम केली होती. या विषयावरून काही प्रश्न निर्माण झाल्यानंतर उद्धव यांनी त्यामध्ये लक्ष घातले. बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी पवार यांनीच स्मारकाचा विषय काढला होता. त्यांनी स्मारकासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली. बाळासाहेबांसारखा आमचा नेता दुसऱ्या नेत्यांनाही वंदनीय वाटत असेल व त्यांनी स्मारक उभारण्यात पुढाकार घेण्याची तयारी
कोहिनूरचा वेग..
लोकांमध्ये अशी चर्चा आहे की एसटी तेथे कोहिनूर. शिवसेनेपेक्षा कोहिनूरचा वेग दिसतो असे म्हटले जाते. याला कारण कोहिनूरमध्ये मला पूर्ण अधिकार होते. पूर्ण अधिकार दिले तर माझा वेग कोठेही दाखवू शकतो.
सेनेचे युवा नेतृत्व..
युवा नेतृत्वाबाबत सगळेच सांगणे कठीण आहे. परंतु सर्वसाधारणपणे जीवनात यशस्वी होण्यासाठी गरज असते ती अनुभवाची. युवा नेत्यांना तो मिळायला वेळ लागतो. त्यासाठी काही काळ जावा लागतो. पण काही युवा नेते आपोआप युवा नेते बनतात. असे युवा नेते वाडवडिलांच्या असलेल्या गुणांमुळे जन्मत: सद्गुणी..गुणी असतात. नेते असतात.. त्यामुळे त्यांचा मला राग येत नाही..
माझी टीका प्रवृत्तींवर..
निवडणुकीत नेमके कोण निवडून येणार हे सांगणे तसे कठीण असते. निवडणुकीचे भविष्य सांगणे कोणालाही शक्य झालेले नाही. एक खरे की सत्तेचा मार्ग खडतर असतो. त्यासाठी ताकदीने लढावे लागते. लोकांच्या मनात शिरण्याची कला अवगत असली पाहिजे. भाजप नेते लालकृष्ण आडवाणी म्हणायचे, हिंदू जाती जातींमध्ये विभागला गेला आहे. तेच मराठी लोकांबद्दलही म्हणता येईल. मन बदलण्याचे काम झाले की मतही बदलू शकेल. केंद्रात मोदींचे सरकार यायला हवे. सर्वाना समान संधी देणारे सरकार हवे. परंतु खरी गरज जर कोणती असेल तर सामान्य माणसांचे प्रश्न सोडविणारे, लोकांच्या गरजा भागवणारे सरकार लोकांना हवे आहे. लोकांच्या गरजा पुऱ्या होतात का तर त्याचे उत्तर नाही. महाराष्ट्रात युतीचे सरकार १९९५ साली आले. त्या वेळी साखर, गहू, तांदूळ अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचे वचन दिले होते. १९९९ साली मी मंत्रालयासमोर एक बोर्ड लावला होता. त्यात मी मुख्यमंत्री बनलो तेव्हाचे भाव व ९९ साली असलेले भाव एकच असल्याचे दाखवून दिले. कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या भावात तेव्हा वाढ झालेली नव्हती. इच्छाशक्ती असेल तर मार्ग निश्चित निघतो. मी राजकीय टीका करत असलो तरी माझी खरी टीका ही प्रवृत्तींवर आहे. आज साठ वर्षांनंतरही आपण का लोकांना साधे पिण्याचे पाणी देऊ शकत नाही? शरम वाटते. कशाला उगाच मोठय़ा मोठय़ा गप्पा मारायच्या. सरकारकडे पैसा आहे परंतु आम्ही लोकांना साधी भाकरी देऊ शकत नाही? जे मंत्री आपल्या गाडीतून उतरून लोकांच्या प्रश्नांकडे पाहत नाहीत, त्यांनाच आपण पुन्हा पुन्हा निवडून देतो..
‘जस्टीस राइट नाऊ..’
बाळासाहेबांची एक कार्यपद्धती होती. त्यांनी शिवसेनेला निर्धाराने पुढे नेले. येणाऱ्या संकटांशी सामना करत निर्धाराने पुढे गेले तर यश निश्चित आहे. निश्चयाला कृतीची जोड दिली तर कोणतीही गोष्ट होऊ शकते, असे बाळासाहेब म्हणत असत. एक दिवस महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, मी आणून दाखवेन, असे ते विश्वासाने सांगत.. आणि १९९५ साली युतीची सत्ता राज्यात आली. बाळासाहेबांनी आपले शब्द खरे केले. बाळासाहेब म्हणजे ‘जस्टीस राइट नाऊ’.. त्यामुळेच लोकांचा शिवसेनेवर विश्वास बसला. एखादी घटना त्यांच्या कानावर गेली तर तात्काळ फैसला होत असे. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती बदलली आहे. नरेंद्र मोदी यांच्या चरित्रातून एक दिसते ते म्हणजे त्यांच्या शब्द व कृतीत मेळ आहे. हे ज्यांना जमत नाही त्यांनी राजकारणात येऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. अन्याय झाला की बाळासाहेब ‘आदेश’ द्यायचे आणि शिवसैनिक तो तात्काळ अमलात आणायचे. त्यामुळे अनेकांना न्याय मिळाला. आता शक्ती मिल बलात्कार प्रकरणात न्यायालयानेच फाशीची शिक्षा सुनावली, पण हेच जर बलात्कार करणाऱ्यांना शिवसेनेने चोपले असते व त्यात त्यांचा मृत्यू झाला असता तर प्रचंड टीका आमच्यावर झाली असती. बाळासाहेबांनी जागच्या जागी न्याय करताना कोणत्याही टीकेची पर्वा केली नाही.
शिवसेना-राष्ट्रवादी युतीचा प्रस्ताव..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत शरद पवार यांनी उद्धव यांच्याकडे विचारणा केल्याचे उद्धव यांचेच म्हणणे आहे. स्मारक हा विषय तेच पाहत आहेत. स्मारकाची जबाबदारी स्वीकारूनही पवार
राज-उद्धव एकत्र येतील?
माझे आडनाव हे जोशी आहे पण राज व उद्धव एकत्र येतील का, हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही. त्यामुळे ते कधी एकत्र येतील हे सांगता येणार नाही. परंतु त्यांनी एकत्र यावे असे मला निश्चितपणे वाटते. त्यांच्यामधील भांडणे मिटली पाहिजेत असेही माझे म्हणणे आहे. राज व उद्धव यांच्यातील भांडण एवढे कडक आहे की त्यातून मार्ग काढण्याची आज तरी यापैकी कोणाची इच्छा नाही. राज शिवसेनेचे नव्हे तर उद्धव यांचे
आणखी वाचा – माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरेंकडून प्रकृतीची विचारपूस
बाळासाहेब असते तर दसरा मेळाव्यात अपमान झालाच नसता..
बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या दसरा मेळाव्यात ज्या पद्धतीने माझा अपमान झाला त्याचे मला खूपच वाईट वाटले. खूप क्लेशकारक घटना होती. ४५ वर्षांच्या शिवसेनेच्या प्रवासात माझा असा अपमान कधी झाला नाही. गैरसमजातून हा अपमान झाला. एकतर अपुऱ्या माहितीमुळे अथवा जणूनबुजून हे झाले असावे.
विहिणीने सांगितलेले भविष्य..
राजकारणात मला अनेक पदे मिळाली. मुख्यमंत्री झालो. त्यापेक्षाही अनेक मोठी पदे अजून शिल्लक आहेत. परंतु यशस्वी कोणाला म्हणायचे? व्यवहाराचा विचार करता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला विद्या-ज्ञान पाहिजे. चांगले शिक्षण झाले पाहिजे. पैसा मिळाला पाहिजे. तो चांगल्या उद्योगातून मिळाला पाहिजे. कुटुंब सुखी असले आणि हे सर्व मिळाले तर तो सुखी माणूस.. आपण जे स्वप्न पाहतो त्याप्रमाणे कृती करून यशस्वी होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राला सुखी व समृद्ध करण्याचे स्वप्न मी पाहत आहे. त्यासाठी मीच मुख्यमंत्री बनले पाहिजे असे नाही. त्यापेक्षा किती तरी मोठी पदे अजूनही रिकामी आहेत. आमच्या विहीणबाई, वसुधा वाघ या उत्तम ज्योतिषी होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही खूप मोठे पद मला मिळणार आहे. अर्थात माझा कर्मकांडावर विश्वास नाही तर कर्म करण्यावर विश्वास आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करणे माझ्या हातात आहे. ते मी करतो. अर्थात जेवढी जबाबदारी मोठी तेवढी त्यांची दु:खेही मोठी असतात..
आणखी वाचा – “मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप
वाचन आणि नरेंद्र मोदींचे चरित्र..
वाचनाची मला पहिल्यापासूनच आवड आहे. वाचनामुळे माणूस घडतो. खरेतर त्यामुळेच अनेक परीक्षांना मी बसलो आणि उत्तीर्णही झालो. वाचनाची आवड अनेक मोठय़ा नेत्यांना आहे. किंबहुना प्रत्येक मोठय़ा नेत्याचे
केंद्रात पद मिळेल..
केंद्रात कोणत्याही परिस्थितीत सत्तांतर हे होणारच.. प्रथमच माझ्याशिवाय दक्षिण मध्य मुंबईत निवडणूक होत असली तरीही निवडणूक न लढता मिळू शकतील अशा अनेक जागा केंद्रामध्ये आहेत. शिवसेना पक्षप्रमुख अशा जागेसाठी माझा विचार करून मला ती निश्चितपणे देतील, असा मला विश्वास आहे. सत्तांतरानंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनतील व त्यांच्याशीही माझा चांगला संबंध असल्यामुळे अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. मी प्रचारात सक्रिय आहे. अनेक ठिकाणी फिरतो. दक्षिण मध्य मुंबईमध्येही शिवसेनेला म्हणून मतदान होत असते व ते शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना मिळून ते विजयी होतील.
उद्धवही बाळासाहेबांसारखे भाषण करतात..
बाळासाहेबांबरोबर अनेकजण शिवसेनेत पट्टीचे वक्ते होते. तेव्हाच्या भाषणांची मजा काही औरच होती. वक्त्यांची भाषेवर पकड होती. ती मजा आता दिसत नाही. तेव्हा प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी असे अनेकजण सभा गाजवून सोडायचे. बाळासाहेबांच्या भाषणाचा बाजच वेगळा होता. थेट शिवसैनिक आणि श्रोत्यांशी संवाद साधण्याची त्यांची शैली होती. भीमगर्जना केल्यासारखे त्यांचे भाषण नसायचे. त्यांची स्वत:ची अशी एक शैली होती. वाचन आणि आकलन उत्तम असण्याबरोबरच प्रतिभासंपन्न असल्यामुळे एक जबरदस्त पकड त्यांच्या वक्तृत्वामध्ये होती. उद्धव ठाकरे यांच्या आताच्या भाषणातही बाळासाहेबांचा भास होतो. सुरुवातीचे उद्धव आणि आताचे याच पुष्कळ फरक पडला आहे. ४५ वर्षे मी बाळासाहेबांना ऐकत आलो आहे. त्यांचे काही गुण-दोष माझ्यातही आले आहेत. अनुभव आणि वाचनातूनही प्रतिभाशक्तीचा विकास होतो. काहीजणांकडे जन्मत:च प्रतिभेची देणगी असली तरी त्याच्या विकासासाठी वाचन आवश्यक आहे. उद्धव यांच्याकडेही बाळासाहेबांचा भाषणाचा वारसा आला आहे. खरे म्हणजे प्रत्येक मोठय़ा माणसाला भाषणाची कला येणे गरजेचे आहे.
राजही बाळासाहेबांसारखा बोलतो..
उत्तम भाषणासाठी वाचन, फिरणे आणि अनुभव यांची आवश्यकता असते. शिवसेनेत कोण वाचतो असे विचाराल तर मी वाचतो. वेळ मिळेल तेव्हा वाचन सुरूच असते. राज ठाकरे यांना स्वत:ची स्टाइल आहे आणि ती बाळासाहेबांसारखीच आहे. भाषण करताना बाळासाहेब जसे मध्येच थांबत तसेच राज व उद्धव हे दोघेही भाषण करताना एखादा मुद्दा सांगून पॉज घेतात.
शिवसेनेविषयी प्रेम आहे..
लोकांना शंभर टक्के शिवसेना आपली वाटत नाही, हे खरे नाही. मतांचे गणित वेगळे असते. लोकांच्या मनात शिवसेनेविषयी आकर्षण आहे तसेच प्रेमही आहे. मात्र मराठी माणूस भांडण विसरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीत अपमान झाल्यानंतर ते तात्काळ औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर पडले होते. त्यांनी दाखविलेल्या स्वाभिमानाचे आजही आपण कौतुक करतो. असाच स्वाभिमान प्रत्येक माराठी माणसाने जपला पाहिजे. मराठी माणूस यातच कमी पडतो. मराठी माणूस एकजुटीने उभा राहात नाही. खरेतर शिवसेना म्हणजे ‘अॅक्शन’.. मराठी माणसाला शिवसेनेवर विश्वास आहे परंतु तो मतदानातून दिसून आला तर अधिक चांगले..
या कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive येथे भेट द्या.