हॉटेल टेंझो टेंपल, लुईसवाडी, ठाणे तर्फे धमाल आणि मस्तीभरा बॉलीवूड धाबा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. नेहमीच स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे हॉटेल टेंझो टेंपलचा हा फेस्टिवल ५ मार्चपासून सुरू झाला असून तो १९ मार्चपर्यंत चालणार आहे. महोत्सवाचे ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे. अनोखा, दिमाखदार असा हा भव्य खाद्य उत्सव (फूड फेस्टिव्हल) आहे. या आधीही टेंझो टेंपलने ठाणेकरांनी अनेक नावीन्यपूर्ण मेजवान्या दिल्या आहेत. बॉलीवूड धाबा ही तर ठाणेकर खवय्यांसाठी एक आगळी-वेगळी पर्वणीच ठरणार आहे. बॉलीवूड धाबा फेस्टिव्हलमध्ये गार्डनचे पूर्ण रूपच पालटणार आहे. हिंदी सिनेमामधील धाब्यांसारखे, धाबा फेस्टिव्हलमध्ये जेवण आणि तशीच गार्डनची सजावट हे सर्व अनुभवताना जणू आपण बॉलीवूडचे शूटिंगच पाहायला आलो आहोत, असा भास होईल. बॉलीवूड धाबा स्टाइल जेवण तसेच वातावरण. अशा या १५ दिवसांच्या धाब्याच्या जत्रेची मजा लुटायला सर्व ठाणेकर नक्कीच गर्दी करतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2014 रोजी प्रकाशित
बॉलीवूड धाबा फेस्टिव्हल
हॉटेल टेंझो टेंपल, लुईसवाडी, ठाणे तर्फे धमाल आणि मस्तीभरा बॉलीवूड धाबा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. नेहमीच स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे हॉटेल टेंझो टेंपलचा हा फेस्टिवल ५ मार्चपासून सुरू झाला असून तो १९ मार्चपर्यंत चालणार आहे.
First published on: 06-03-2014 at 07:39 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood dhaba festivel