महापालिका निवडणुकीचे निकाल धुळेकरांना सहजगत्या उपलब्ध व्हावेत यासाठी महापालिकेत पडद्यावर दाखविण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त के. व्ही. धनाड यांनी दिली आहे. मतमोजणी १६ डिसेंबर रोजी शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात होणार आहे. सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीची व्यवस्था शहरापासून लांब करण्यात आल्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणीही पडदा लावण्यात येणार आहे. ध्वनिक्षेपकाव्दारेही निकाल सांगण्यात येणार आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-12-2013 at 07:15 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election results show on the screen system