महिन्याभरापासून चण्याचे चुकारे न देणाऱ्या नाफे डने आता कसलेच कारण न देता चणाखरेदी थांबविल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पावसाचे पाणी लागलेला (रेनटच) चणा खरेदी न करण्याचे स्पष्ट निर्देश विदर्भाचा कारभार पाहणाऱ्या अकोला येथील नाफेडच्या उपमहाव्यवस्थाकांनी दिले आहे, तसेच त्यापूर्वी खरेदी केलेल्या चण्याचा २ कोटी ४७ लाख रुपयांचा चुकाराही महिना लोटूनही न मिळाल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.
चणा खरेदी सुरू करावी म्हणून किसान अधिकार अभियानाने पाच दिवसांपासून सत्याग्रह आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची भूमिका उपमहाव्यवस्थापक शर्मा यांनी घेतली असल्याचा अनुभव संघटनेचे अविनाश काकडे यांनी कथन केला. एक महिन्यापासून जिल्हा विपणन कार्यालयामार्फ त नाफे डची चणा खरेदी सुरू होती. बाजारात चणा व तुरीचे भाव कमी असल्याने विदर्भातील शेतकरी नाफे डकडे हमीभावाने त्याची विक्री करीत आहे. एकटय़ा वर्धा जिल्ह्य़ात कोटय़वधीची चणा खरेदी झाली, पण चुकारा नाही. नाफे डचे अधिकारी स्वत: खरेदीच्या वेळी उपस्थित राहणे अपेक्षित असतांनाही केवळ दूरध्वनीवरून सूचना करतात. धान्याचे संॅपल पाठविण्याचे सांगतात. २८ मार्चला नवाच आदेश उपव्यवस्थापक शर्मा यांनी काढला आहे. आंदोलक अविनाश काकडे म्हणातात, हा आदेश पूर्णत: बेकायदेशीर आहे. नाफे डच्या एफएक्यूच्या निकषानुसार खरेदी होते. त्यात रेनटच चणा खरेदी करा किंवा करू नये, असे नमूदच केलेले नाही. चण्याची आद्र्रता बारा टक्क्यांपेक्षा कमी असली तरी चणा खरेदी होऊ शकतो. अन्य निकषांमध्येही हा चणा खरेदीयोग्य असल्याचे स्थानिक अधिकारी मान्य करतात. मात्र, नाफेडचे शर्मा लिखित आदेश किंवा कारण न देता केवळ दूरध्वनीवरून सूचना करतात व खरेदी टाळतात, असे काकडे यांनी स्पष्ट केले. आता तर ते आंदोलकांशी चर्चा करायलाही तयार नाहीत. आम्ही फॅक्सद्वारे मागणी नोंदवित उत्तरे मागवित होतो. आता त्यांनी त्यांच्या कार्यालयातील फॅ क्स मशिनच बंद करून टाकली. दूरध्वनी घेत नाहीत, असे काकडे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2014 रोजी प्रकाशित
नाफे डने एकाएकी चणाखरेदी थांबविल्याने शेतकरी अडचणीत
महिन्याभरापासून चण्याचे चुकारे न देणाऱ्या नाफे डने आता कसलेच कारण न देता चणाखरेदी थांबविल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
First published on: 03-04-2014 at 03:35 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers face trouble after gramme purchase stop