मूळ भटक्या विमुक्तांवर अन्याय होऊ नये यासाठी निवासी क्षेत्रात पुराव्याआधारे जाती दाखला देण्यासंदर्भात राजपत्रात दुरूस्ती करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी दिले.
येथे अखिल भारतीय दशनाम गोसावी महाराष्ट्र प्रदेश आणि नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज, भटक्या विमुक्त जाती जमाती शिक्षण विकास व संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रा. फरांदे बोलत होत्या. भटक्या विमुक्तांसह सर्व मागासवर्गीयांनी भाजपला साथ दिली. त्यांचे ऋण फेडण्यासाठी भाजप सरकार बांधील असल्याचेही त्यांनी नमूद केले. जातीच्या दाखल्यासाठी अर्जदार किंवा वडील, आजोबा यांचे कायमचे ठिकाण आणि जन्म ठिकाण ही अट असलेल्या सप्टेंबर २०१२ च्या राजपत्रात दुरूस्ती करून सर्व मागासवर्गीयांना न्याय देणे व इतर जनहिताच्या प्रश्नांसाठी आक्रमक होण्याची ग्वाहीही फरांदे यांनी दिली. भटक्या विमुक्तांच्या प्रत्येक लढय़ाची दखल घेण्याचे आश्वासन आ. बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे, आ. योगेश घोलप यांनी दिले.
या सर्व आमदारांचा तसेच अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज संस्थेवर निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डी. के. गोसावी, राष्ट्रीय महासचिव संदीप गोसावी, राष्ट्रीय प्रचार सचिव भाऊसाहेब भारती या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सूर्यभान गोसावी, प्रास्तविक बापू बैरागी, संजय गोसावी यांनी केले.