डोंबिवलीत अलीकडेच महिलांवर घडलेल्या अत्याचारांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या कल्याण जिल्हा शाखेतर्फे शनिवार २२ डिसेंबर रोजी ‘महिला अत्याचार विरोध संघर्ष मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. येथील ज्ञानेश्वर हिंदी विद्यालयात दुपारी ४ वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आमदार नीलम गोऱ्हे, आमदार एकनाथ शिंदे, विशाखा राऊत, मीना कांबळी, अनिता बिर्जे, जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, प्रभाकर चौधरी या शिवसेनेतील नेत्यांसह लेखिका माधवी घारपुरे, शुभदा खटावकर, अ‍ॅड्. मंदाकिनी पाटील सहभागी होणार आहेत.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People awareness on ladies outrage in dombivali