DIAT Pune recruitment 2024: डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हॉन्स टेक्नॉलॉजीमध्ये सध्या ‘जुनियर रिसर्च फेलो’ या रिक्त पदावर भरती सुरू आहे. या पदावर नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ते पाहा. तसेच, पदासाठी पात्रता निकषदेखील जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

DIAT Pune recruitment 2024: पदसंख्या

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हाॅन्समध्ये जुनियर रिसर्च फेलो या पदासाठी केवळ एक जागा रिक्त आहे.

DIAT Pune recruitment 2024: शैक्षणिक पात्रता

ज्युनिअर रिसर्च फेलोसाठी खालीलपैकी कोणत्याही क्षेत्रात पदवी आवश्यक आहे.

इंजिनिअरच्या कोणत्याही शाखेमध्ये बी.ई./बी.टेक. [ BE/BTech.] नेट/गेट [NET/GATE] सह प्रथम श्रणीमध्ये पदवी

इंजिनिअरच्या कोणत्याही शाखेत एम.इ./एम.टेक [ M.E./M.Tech] पदवी आणि पदव्युत्तर स्तर प्रथम श्रेणीत

भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रात एम.एस्सी [M.sc] किंवा गेट/नेट/एसएलइटी [GATE/NET/SLET] गुणांसह प्रथम श्रेणीत पदवी.

DIAT Pune recruitment 2024 – डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हाॅन्स टेक्नॉलॉजी अधिकृत वेबसाईट –
https://diat.ac.in/

DIAT Pune recruitment 2024 – अधिसूचना –
https://diat.ac.in/wp-content/uploads/2024/03/Advt-No.07-2024-JRF.pdf

हेही वाचा : IUCAA Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा ‘या’ पदासाठी होणार भरती…

DIAT Pune recruitment 2024: वेतन

ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास, दरमहा ३७,०००/- रुपये इतके वेतन दिले जाईल.

DIAT Pune recruitment 2024: अर्ज प्रक्रिया

ज्युनिअर रिसर्च फेलो या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी खालील ई-मेल आयडीचा वापर करावा
अर्जाचा ई-मेल आयडी – recruit@diat.ac.in
अर्ज पाठवताना उमेदवाराने त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरावी.
तसेच अर्जात पूर्ण आणि योग्य माहिती भरणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येऊ शकतो, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
अर्ज पाठवताना त्यासह आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी.
इच्छुक उमेदवाराने अर्ज अंतिम तारखेआधी भरणे अनिवार्य आहे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही २० मार्च २०२४ अशी आहे.
ज्युनिअर रिसर्च फेलो या पदासंबंधी नोकरीबाबत उमेदवारास अतिरिक्त माहिती हवी असल्यास, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हाॅन्स टेक्नॉलॉजीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा या नोकरीसंबंधीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diat pune recruitment 2024 how to apply for junior research fellow position what is the last date for application dha
First published on: 10-03-2024 at 17:43 IST