मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रीस्ट आणि ऑडिओ लॉजिस्ट, या पदांच्या ४२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रीस्ट आणि ऑडिओ लॉजिस्ट.
एकूण पदसंख्या – ४२
नोकरीचे ठिकाण – मुंबई</strong>
वयोमर्यादा –
- वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, – ६० वर्ष.
- इतर पदांसाठी खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष.
अर्जाची पद्धत – ऑफलाइन
निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे
वेबसाईट – http://www.ltmgh.com
अर्ज शुल्क – वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार – ५८० रुपये + GST.
कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रीस्ट आणि ऑडिओ लॉजिस्ट – २९१ रुपये + GST.
हेही वाचा- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
- वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार –
डिस्पॅच सेक्शन, तळमजला, कॉलेज कॅन्टीन जवळ, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई – ४०००२२.
- कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रीस्ट आणि ऑडिओ लॉजिस्ट –
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, कॉलेज बिल्डिंग, तळमजला, रोख विभाग, खोली नंबर १५
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ जुलै २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख – १४ ऑगस्ट २०२३
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.
पगार – पदानुसार २५ हजार ते २ लाखांपर्यंत पगार मिळणार