नोकरी ही शिक्षण पाहून दिली जाते, असे आपण अनेक वर्ष ऐकत आलो आहोत. मात्र, आजच्या मॉडर्न युगात नोकरी ही तुमच्या शिक्षणापेक्षा तुमच्यातील कौशल्यांकडे पाहून दिली जाते. सध्याची तंत्रज्ञानातील प्रगती पाहता, पुढे बहुतेक नोकऱ्यांवर जनरेटिव्ह एआयचा प्रभाव असेल. मात्र, असे असले तरीही काही ‘पारंपरिक’ नोकऱ्यांची मागणी ही कायम राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा कोणत्या क्षेत्रात नोकरी करावी असा प्रश्न पडला असेल तर ती नेमकी कोणत्या क्षेत्रात निवडावी असा तुम्हाला प्रश्न पडला आहे का? तर, ‘टीमलीज डिग्री’ अप्रेंटिसशिपचे मुख्य स्ट्रॅटिजी अधिकारी, सुमित कुमार यांनी सध्या २०२४ मध्ये सर्वाधिक मागणी असणाऱ्या क्षेत्रातील नोकरीची यादी दिली असल्याची माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते. ती यादी पाहा.

हेही वाचा : बारावीनंतर काय करायचं ठरत नाही? पर्यटनाची आवड असल्यास Tourism क्षेत्रातील नोकरीचे पर्याय पाहा

१. डेटा आर्किटेक्ट्स [DATA ARCHITECTS]

डेटा आर्किटेक्चर डिझाइन आणि रॉबडस्ट [robust] सांभाळतात. ऑर्गनायझेशनच्या गरजांनुसार माहितीची कार्यक्षम हाताळणी सुनिश्चित करून ते संस्थांना कार्यक्षम बनवण्यास मदत करतात.

२. ब्लॉकचेन डेव्हलपर्स [Blockchain Developers ]

जे विकेंद्रित [decentralised] तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आहेत, ते ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून ब्लॉकचेन विकसित करून, ॲप्लिकेशन सांभाळण्याचे काम करतात. याचा वापर करून व्यवहार प्रक्रिया सुरक्षित करण्याचे काम केले जाते. तसेच इतर विविध क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

३.एआय डेव्हलपर्स [AI DEVELOPERS]

एआय डेव्हलपर्स हे विविध उद्योगांची कार्यक्षमता वाढवून, त्यासाठी अत्याधुनिक ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी मदत करतात. तसेच झपाट्याने प्रगत होत चाललेल्या तांत्रिक क्षेत्रात अधिक विकास होण्यासाठी अल्गोरिदमचे डिझाइन करणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य करतात.

४. व्यवसाय विश्लेषक [ BUSINESS ANALYST]

सध्याची आर्थिक उत्पादने आणि बाजारातील ट्रेंडच्या योग्य माहितीनुसार, ग्राहकांच्या आर्थिक गरजांचे निरीक्षण आणि विश्लेषण करून त्यांच्यासाठी फायदेशीर असणाऱ्या वैयक्तिक गुंतवणुकीचा सल्ला या क्षेत्रात दिला जातो.

हेही वाचा : Jobs News 2024 : लातूरकरांसाठी ‘अधिकारी’ पदावर नोकरीची संधी! ‘या’ बँकेत होणार भरती…

५. आर्थिक विश्लेषक [FINANCIAL ANALYSTS]

या क्षेत्रात भविष्यातील किंवा पुढील कामगिरीचा अंदाज लावण्यासाठी कंपन्या, उद्योग आणि बाजारपेठेतील आर्थिक डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण केले जाते. आर्थिक विश्लेषकांनी केलेल्या अभ्यासावरून, विश्लेषणावरून कंपनीचे किंवा संस्थेचे भविष्यातील धोरण कसे असेल या निर्णयाबाबत मार्गदर्शन केले जाते. संस्थेची भविष्यातील दिशा ठरविली जाते.

६. किरकोळ विक्री [RETAIL-SALES]

ग्राहकांचे स्वागत करून त्यांच्याशी बोलून त्यांच्या गरज समजून घेणे. तसेच त्यांच्या गरज पूर्ण करणारी उत्पादने त्यांना सुचवणे हे या क्षेत्रात केले जाते. या क्षेत्रात काम करण्यासाठी व्यक्तीकडे लोकांशी बोलण्याचे कौश्यल्य, ग्राहकांना योग्य ती सेवा देण्याची तयारी अशा सर्व गोष्टींची आवश्यकता असते.

७. हॉस्पिटल मॅनेजमेंट [HOSPITAL MANAGEMENT]

रुग्णालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, रुग्णालयातील रुग्णांची काळजी, त्यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचा वापर सुनिश्चित करण्याचे काम या क्षेत्रात केले जाते. उत्तमोत्तम पॉलिसी देऊ करणाऱ्यांसह आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांशी या क्षेत्रातील व्यक्तींचा संबंध येतो. एकंदरीत रुग्णालये सुरळीत चालू ठेवण्यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंटचा प्रचंड मोठा वाटा असतो.

अशा वर्ष २०२४ मधील काही मागणी असणाऱ्या क्षेत्रांबद्दलची माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the most popular signs jobs based on tech and skills in 2024 find out dha
First published on: 25-03-2024 at 19:31 IST