Career In Tourism: फिरणे कुणाला आवडत नाही? प्रत्येकाला कुठे ना कुठे जायची, त्या जागेबद्दल माहिती घेण्याची आवड असते. मग ही आवड जोपासत तुम्हाला त्यामध्येच करिअर करता आले तर? अनेकांना बारावीनंतर कुठल्या प्रकारचे शिक्षण घ्यावे, यामध्ये गोंधळ उडत असतो. त्यांच्यासमोर भरपूर पर्याय असतात खरे, मात्र कुठला पर्याय त्यांना खरंच उपयोगी पडू शकतो हे त्या वयात समजत नाही.

तुम्हाला जर फिरायची, भटकंती करायची आणि नवीन जागांबद्दल माहिती घ्यायची आवड असेल तर तुम्ही टुरिझम म्हणजेच पर्यटन क्षेत्राचा विचार करू शकता. या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी असून, ज्यांना परदेशात जायचे असेल त्यांनाही फायद्याचे ठरू शकते. दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच पार्शवभूमीवर या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण घेणे आवश्यक असते ते पाहा. त्यासह पर्यटन क्षेत्रात किती पगार मिळू शकतो आणि कोणत्या पद्धतीच्या नोकऱ्या उपलब्ध असतात तेही पाहू.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

हेही वाचा : Bank of Baroda 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर पदासाठी निघाली भरती; अर्ज करण्यासाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या

पर्यटन क्षेत्रातील शिक्षण

टुरिझम किंवा पर्यटन क्षेत्रात उत्तम नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी सुरुवातीला बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे आवश्यक असते. यानंतर तुम्ही यामध्ये पदवी शिक्षण किंवा डिप्लोमा करू शकता. पर्यटनामध्ये तुम्ही बॅचलर्स ही पदवी मिळवू शकता किंवा पर्यटन आणि प्रशासनामध्ये [tourism and administration] BBA करू शकता. तसेच तुम्ही या विषयात पदव्युत्तर म्हणजे मास्टर्सचे शिक्षणदेखील घेऊ शकता.
जर तुम्हाला पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे नसल्यास, डिप्लोमा कोर्स करू शकता.

पर्यटन क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी काही उत्तम संस्था

१. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर
२. आयआयटीएम, नेल्लोर
३. EITM, भुवनेश्वर
४. ख्रिस्त विद्यापीठ, बंगलोर
५. जामिया, नवी दिल्ली

हेही वाचा : IRCON Assistant Manager 2024 : IRCON इंटरनॅशनल, असिस्टंट मॅनेजर पदासाठी मोठी भरती; अर्जाची अंतिम तारीख पाहा

पर्यटन क्षेत्रातील नोकरी आणि पगार

या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही टूर मॅनेजर, ट्रॅव्हल गाईड, ट्रॅव्हल एजंट, ट्रॅव्हल स्पेशालिस्ट, टुरिझम ऑफिसर आणि ट्रॅव्हल कन्सल्टंट म्हणून नोकरी मिळवू शकता. त्यासह एखाद्या पर्यटन कंपनीसोबत काम करू शकता.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम पगाराची नोकरी मिळू शकते. वार्षिक पाच ते सात लाखांची नोकरी व्यक्तीला मिळू शकते. म्हणजे महिन्याला साधारण ४५ ते ६० हजार. कालांतराने हा पगार वाढून महिना एक लाख रुपये मिळू शकतात, अशी माहिती एबीपी न्यूजच्या एका वृत्तावरून समजते.