Jobs News 2024 : लातूरमधील लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेमध्ये सध्या भरती होणार आहे. या बँकेमध्ये ‘आयटी अधिकारी’ [IT Officer] आणि ‘अधिकारी’ [Officer] या रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांवरील नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज कुठे आणि कसा करायचा, अर्जाची अंतिम तारीख व पात्रता निकष काय आहेत याची माहिती पाहा.

Jobs News 2024 : वयोमर्यादा

लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेमध्ये ‘आयटी अधिकारी’ पदासाठी अर्ज करण्याचे वय हे २५-५० वर्षांदरम्यान असावे.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Defence Institute of Advanced Technology pune jobs
DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर होणार भरती; जाणून घ्या….
RITES Limited hiring 2024
RITES Limited recruitment 2024 : RITES लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या अधिक माहिती…
ITAT Mumbai Recruitment 2024 job in income tax mumbai
ITAT Mumbai Recruitment 2024 : मुंबईत ‘आयकर’ विभागात नोकरीची संधी! पाहा भरतीची माहिती

लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेमध्ये ‘अधिकारी’ पदासाठी अर्ज करण्याचे वय हे २५-५० वर्षांदरम्यान असावे.

Jobs News 2024 : शैक्षणिक पात्रता

१. आयटी अधिकारी

आयटी अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील शिक्षण असणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. आयटी [B.E. IT] / कॉम्प्युटर विज्ञान [Computer Science]/ (आय.टी.) MCA/ MCS इत्यादी संबंधित विषयांत शिक्षण घेतलेले असावे.
  • बँकिंग सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्किंग व सायबर सिक्युरिटी इत्यादींबाबत सखोल ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • तसेच, आय.टी. विभागात कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनाही प्राधान्य दिले जाईल.

२. अधिकारी

अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील शिक्षण असणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी व त्यासोबत JAIIB / GDCA / DCM किंवा सहकारसंबंधित शिक्षण घेतलेले असावे. वित्त विषयातील एमबीए [MBA (Fin.)] अथवा उच्च पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • किमान पाच वर्षे अधिकारी / शाखाधिकारी पदावर बँक किंवा वित्तीय संस्थेत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : IGI Aviation recruitment 2024 : कस्टमर सर्व्हिस एजंटसाठी मोठी भरती! पाहा अर्ज प्रक्रिया

Jobs News 2024 – लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेची वेबसाइट –
https://www.lucbank.in/

Jobs News 2024 – अधिसूचना –
https://www.lucbank.in/careers/

Jobs News 2024 : अर्ज प्रक्रिया

आयटी अधिकारी किंवा अधिकारी पदासाठी नोकरीचा अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज भरताना त्याबरोबर आपली आवश्यक ती सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे, ओळखपत्रे जोडणे अत्यंत आवश्यक आहे.
अर्जामध्ये भरलेली माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज हा अंतिम तारखेआधी भरावा.
नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही ५ एप्रिल २०२४ अशी आहे.
ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी hr@lucbank.in या ई-मेल अॅड्रेसचा वापर करावा.

आयटी अधिकारी किंवा अधिकारी या पदांवरील नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना नोकरीसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीसंबंधी अधिसूचना वाचावी. वेबसाइट, तसेच नोकरीची अधिसूचना वर नमूद केलेली आहे.