Mani Shankar Aiyar On Gandhi Family : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आळे आहेत. मणिशंकर अय्यर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अय्यर यांनी गांधी कुटुंबासंबंधी काही दावे केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी मागील १० वर्षात त्यांना फक्त एक वेळा सोनिया गांधी यांना भेटण्याची संधी मिळाल्याचे म्हटले आहे. तसेच गांधी कुटुंबाने माझी राजकीय कारकीर्द घडवली आणि बिघडवली, तरीही मी भाजपामध्ये जाणार नाही, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अय्यर म्हणाले की, “मला १० वर्ष सोनिया गांधींना समोरा-समोर भेटण्याची एकही संधी दिली गेली नाही. राहुल गांधींबरोबर एक प्रसंग वगळता त्यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळालेली नाही. तर मी प्रियांका गांधी यांच्याबरोबर भेट झाली नाही, एक दोन प्रसंग वगळता आम्ही कधी एकत्र आलो नाही, त्या माझ्याबरोबर फोनवर बोलत असतात, म्हणून मी त्यांच्या संपर्कात आहे”.

पुढे बोलताना अय्यर म्हणाले की, “माझ्या आयुष्यातील विडंबना ही आहे की माझी राजकीय कारकीर्द गांधींनी घडवली आणि गांधींनींच बिघडवली. मला पक्षाबाहेर राहण्याची सवय झाली आहे. मी अजूनही पक्षाचा सदस्य आहे. मी पक्ष कधीही बदलणार नाही, आणि मी भाजपमध्ये नक्कीच जाणार नाही”. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

अय्यर यांनी सांगितले की, एकदा राहुल गांधी यांना शुभेच्छा पाठवण्यासाठी त्यांना प्रियांका गांधी यांना फोन करावा लागला होता. तसेच सोनिया गांधी यांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या ङोत्या तर मॅडमनी मी ख्रिश्चन नाही असे म्हटले होते.

हेही वाचा>> छगन भुजबळांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंचं मोठं विधान; म्हणाले, “अजित पवार स्वत:…”…

मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे की २०२४ च्या निवडणुकीत त्यांना राहुल गांधी यांना तिकीट दिले नाही आणि राहुल गांधी म्हणाले होते की कुठल्याही परिस्थितीत मणिशंकर अय्यर यांना तिकीट दिले जाणार नाही, कारण ते म्हातारे झाले आहेत. अय्यर तामिळनाडूच्या मयिलादुथुराऊ येथून तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकले आहेत आणि राज्यसभेत खासदारदेखील राहिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader mani shankar aiyar said my political career was made by the gandhis and unmade by the gandhis rak