पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२८ मे) संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. या सोहळ्यावर अनेक विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं अशी विरोधी पक्षांनी मागणी होती. परंतु सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या मागणीला जुमानलं नाही. अखेर स्वतः नरेंद्र मोदी यांनी या इमारतीचं उद्घाटन केलं. दरम्यान, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी संसदेच्या नवीन इमारतीचं डिझाईन आफ्रिकेतील देश सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांचं ट्वीट रिट्वीट करत काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी लिहिलं आहे, तुम्हालाही असं वाटतं का, “सोमालियाने नाकारलेली हे संसद भवन आपल्या पंतप्रधानांसाठी प्रेरणा आहे.

दिग्विजय सिंह यांनी लिहिलं आहे, जवाहर सरकार यांना पैकीच्या पैकी गुण. तुम्हालाही असं वाटतं का, “सोमालियाने नाकारलेली हे संसद भवन आपल्या पंतप्रधानांसाठी प्रेरणा आहे. कॉपीकॅट आर्किटेक्टकडून २३० कोटी रुपये वसूल करायला हवेत, अशी मागणी सिंह यांनी केली आहे.

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी सोमवारी (२९ मे) ट्वीट केलं की गुजरातमधील मोदींच्या पाळीव आर्किटेक्टने सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी करण्यासाठी २३० कोटी रुपये आकारले आहेत. सोमालियाने त्यांची जुनी संसद नाकारली आहे. सोमालियाने नाकारलेली संसद नव्या भारताची प्रेरणा आहे. गुजरातमधील मोदींचे पाळीव वास्तुविशारद जे नेहमी बोली लावून मोदींकडून मेगा कॉन्ट्रॅक्ट (अहमदाबाद, वाराणसी, दिल्लीची संसद + सेंट्रल व्हिस्टा) मिळवतात, त्यांनी आपल्याकडून सोमालियाच्या डिझाइनची कॉपी करण्यासाठी २३० कोटी रुपये आकारले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digvijay singh says somalia rejected old parliament is new indias inspiration jawhar sircar tweeet asc